नवी दिल्ली: चारा घोटाळाप्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावल्यावर लालू प्रसाद यादव यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. लक्षवेधी असे की, या वेळी लालूंनी विरोधकांवर निशाणा साधताना चक्क कवितेचा आधार घेतला आहे.


मरून जाईन पण झुकणार नाही....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कवितेच्या माध्यमातून लालूप्रसाद यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. संघर्ष आणि दुख: अशा दोन्ही गोष्टी लालूंच्या कवितेतून व्यक्त होताना दिसतात. आपण स्वत: प्रामाणीक असल्याचे सांगतानाच लालूंनी विरोधकांवर खोटेपणाचा आरोप केला आहे. तसेच, आपण मरून जाऊ पण झुकणार नाही, असा स्पष्ट शब्दांत लालूंनी इशारा दिला आहे.


अशी आहे लालूंची कविता 


झूठ अगर शोर करेगा
तो लालू भी पुरजोर लड़ेगा


मर्जी जितने षड़यंत्र रचो
लालू तो जीत की ओर बढ़ेगा.


अब, इनकार करो चाहे अपनी रजा दो
साजिशों के अंबार लगा दो


जनता की लड़ाई लड़ते हुए,
आपका लालू तो बोलेगा चाहे जो सजा दो