रांची :  Doranda case : Lalu Prasad Yadav Guilty : संयुक्त जनता दलाचे (RJD) प्रमुख लालूप्रसाद यादव यांना  डोरंडा प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले आहे. लालू प्रसाद यादव यांच्यासह 75 आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. तर 24 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लालूप्रसाद यादव यांना 21 फेब्रुवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणात 21 दोषींना शिक्षा झाली. उर्वरितांच्या शिक्षेबाबत 21 फेब्रुवारीला निर्णय होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने राजेंद्र पांडे, साकेत लाल, दीनानाथ सहाय, राम सेवक साहू, ऐनुल हक, सनौल हक, अनिल कुमार यांची डोरंडा प्रकरणात पुराव्याच्या आधारे निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष सुटलेल्या आरोपींना न्यायालयाने सोडण्याचे आदेश दिले आहेत.


सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अशोक कुमार यादव यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. श्यामानंदन सिंह यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांना 75,000 रुपये दंड भरावा लागणार आहे. नंदकिशोर प्रसाद यांनाही 3 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 3 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा असलेल्या आरोपींना जामीनपत्र भरण्याची तयारी करण्यास सांगितले आहे.


चारा घोटाळ्यातील सर्वात मोठ्या प्रकरणात RC-47A/96, आज (15 फेब्रुवारी) रांची येथील विशेष CBI न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवले. न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांच्यासह सर्व 99 आरोपींना वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते.


139 कोटींच्या घोटाळ्यात लालू दोषी 


लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याच्या पाच प्रकरणात आरोपी बनवण्यात आले होते. याआधी चार प्रकरणांमध्ये निकाल देण्यात आला असून या सर्व प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. आता पाचव्या खटल्यातही लालू यादव दोषी आढळले आहेत. हे प्रकरण रांचीच्या डोरंडा येथील ट्रेझरीमधून 139.5 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढण्याशी संबंधित आहे.