नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) चे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी म्हणजे १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. गेली अनेक वर्षे देशात चर्चेत असलेल्या आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या चारा घोटाळा प्रकरणी न्यायालात काल (शनिवार) आपला निर्णय देण्यात आला. 


१४ वर्षांचा तुरुंगवास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगवेगळ्या प्रकरणांवरुन सात सात वर्षांची शिक्षा दोन न्यायाधीशांनी ठोठावली आहे. त्याचबरोबर सीबीआयचे विशेष न्यायाधीश शिवपाल सिंग यांनी आरजेडीचे प्रमुख भारतीय दंड संहिताच्या अंतर्गत सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर ३० लाखांचा दंड लागू करण्यात आला आहे. हा दंड न भरल्यास एक वर्ष तुरुंगवास अधिक भोगावा लागेल.


म्हणून प्यायले १० ग्लास पाणी


लालू प्रसाद यांना जेव्हा शिक्षा ठोठावण्यात आली तेव्हा त्यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. एका स्थानिक वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, इतकी मोठी शिक्षा मिळाल्यानंतर लालू प्रसाद यादव यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. त्यांचे ब्लड प्रेशर 124/85     वाढून 140/90 पर्यंत पोहचले. त्यांना दरदरुन घाम फुटला. तोंड कोरडे पडले. २० मिनिटात लालू १० ग्लास पाणी प्यायले.