पद्मावती सिनेमावरुन लालू यादवांचा यूटर्न
लालूप्रसाद यादवांनी पद्मावतीवरील आपल्या वक्तव्यातून माघार घेतली आहे. प्रथम पद्मावतीचं समर्थन करणाऱ्या लालूप्रसादांनी आता पद्मावतींचा विरोध करणाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. लालूंनी म्हटले की, इतिहासाची छेडछाड नाही केली पाहिजे.
पटना : लालूप्रसाद यादवांनी पद्मावतीवरील आपल्या वक्तव्यातून माघार घेतली आहे. प्रथम पद्मावतीचं समर्थन करणाऱ्या लालूप्रसादांनी आता पद्मावतींचा विरोध करणाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. लालूंनी म्हटले की, इतिहासाची छेडछाड नाही केली पाहिजे.
पद्मावतीला विरोध
लालू यादव म्हणाले की, पद्मावती चित्रपटाला विरोध करणारे लोकं बरोबर आहेत. इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये. राणी पद्मावती यांचे जीवन हे गौरवशाली आणि सन्माननीय आहे. ते राजस्थानच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान आहे आणि त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत.
भाजपवर टीका
करणी सेनेचे कार्यकर्त्यांनी राजस्थानमधील पद्मावती चित्रपटाच्या सेटवर खूप वाद घातला होता. सेटवर तोडफोड केली होती. भन्साली यांना धक्काबुकी देखील केली होती. लालू यादवांना या घटनेनंतर ट्विट करत याचा निषेध केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, 'हे जर बिहारमध्ये घडलं असतं तर मीडियाने बिहारला बदनाम केलं असतं पण बिहार शासित राज्यामध्ये झालं तर सर्व शांत आहेत.'