‘भूता’च्या भीतीने लालूच्या मुलाने सोडला सरकारी बंगला!
आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादवचा मोठा मुलगा आणि बिहारचा माजी मंत्री तेजप्रताप यादवने भूतांच्या भीतीने सरकारी बंगला सोडल्याची माहिती आहे.
पटना : आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादवचा मोठा मुलगा आणि बिहारचा माजी मंत्री तेजप्रताप यादवने भूतांच्या भीतीने सरकारी बंगला सोडल्याची माहिती आहे. बरं इतकंच नाहीतर यावर तो म्हणाला की, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सुशील मोदी यांनी त्याच्या सरकारी बंगल्यात भूत सोडले आहेत. त्यामुळेच बंगला रिकामा केलाय.
‘भूत’ बंगला सोडला
तेजप्रताप यादव बोलले की, ‘त्यांच्याकडे आधीपासूनच बंगला आहे आणि मला कोणत्याही सरकारी भीकेची गरज नाही. त्यांच्या या वक्तव्यावर उत्तर देत म्हटले की, आम्हाला नरपिशाचांवर भूत-पिशाच सोडण्याची काय गरज. मोठ्या मुश्किलीने इतक्या मोठ्या भूतपासून पिच्छा सुटला आहे.
सरकारी भीकेची गरज नाही
राजद सुप्रीमो लालू प्रसादचा मोठा मुलगा आणि बिहारचा माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यादवने सरकारी बंगला रिकामा केलाय. त्याना तीन, देशरत्न मार्गावरील बंगला देण्यात आला होता. तेजप्रताप म्हणाले की, त्यांच्याकडे आधीच १० सर्कुलर रोडवर बंगला आहे. त्याना सरकारी भीकेची गरज नाहीये.
जेडीयूकडून जोरदार पलटवार
तेजप्रताप यादवच्या वक्तव्यावर जेडीयूने पलटवार केलाय. जेडीयूची प्रवक्ता डॉ. अजय आलोक म्हणाले की, ‘नरपिशाचांवर भूत-पिशाच सोडण्याची आम्हाला काय गरज. मोठ्या मुश्किलीने इतक्या मोठ्या भूतापासून(लालू यादव) सुटका मिळालीये. तेजप्रतापजी मस्त रहा. भोले बाबाची भक्ती करा आणि भूत-पिशाच नाचवत रहा. यातच तुम्ही बिहारला पुढे न्याल.