Viral News : कोणत्याही शहरात घर भाड्याने (Flat On Rent) देण्याआधी काही नियम पूर्ण करावे लागतात. अनेक शहरात घरमालक बॅचरल (Bachelor) मुलांना शक्यतो घर भाड्याने देत नाहीत. कुटुंब असेल तर अधिक प्राधान्य देतात. याला कारणंही तशीच आहेत. सध्या सोशल मीडियावर (Social Media) काही फोटो व्हायरल होत असून हे फोटो पाहून बॅचरल मुलांना (Flat Vacated by Bachelor) घर भाड्याने देण्यास घरमालक का नकार देतात हे स्पष्ट होईल. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे फोटो बंगळुरुमधल्या एका उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमधील आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे व्हायरल फोटोत?
बंगळुरुत (Bengaluru) एका व्यक्तीने आपलं घर काही उच्च शिक्षित तरुणाला भाडेपट्टी करारावर दिलं होतं. करार संपल्यानंतर त्या मुलाने घर खाली केलं. त्यानंतर घरमालकाने घर उघडून पाहिलं आणि समोरचं दुश्य पाहून तो चक्कर येऊनच पडला. पॉडकास्ट होस्ट रवी हांडा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर याचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर सापडलेत. यासोबत त्यांनी एक कॅप्शन लिहिलं आहे त्यात त्यांनी म्हटलंय, बंगळुरुमध्ये एका व्यक्तीने आपलं घर एका उच्चशिक्षित तरुणाला भाड्याने दिलं. पण घर सोडताना त्या तरुणाने घराची कचराकुंडी करुन टाकली. हा तरुण एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करतो. 


बिअरच्या बाटल्यांचा खच
घरात बिअरच्या बाटल्यांचा अक्षरश: खच पडलेला दिसत आहे. तर स्वंयपाक घरात कचऱ्याचा ढीग पडलेला दिसत आहे. घराच्या भिंती, टाईल्सवर घाणेरडे डाग पडलेले दिसत आहेत. तर स्वंयपाक घरातील ओट्यावरही सर्वत्र घाण पसरली आहे. मॉड्यूलर किचनचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत दिसत आहेत. घरातील लाद्यांवर तर सामान्य माणूस पायही ठेवणार नाही अशी अवस्थी करुन ठेवलेली. अनेक महिने त्या व्यक्तीने घराची साफसफाई केलेली नव्हती.


घराचा करार संपल्यानंतर त्या तरुणाने घर खाली केलं आणि दुसरीकडे निघून गेला. त्यानंतर त्याने घरमालकासा फोन करुन डिपॉझिटची मागणी केली. पण जेव्हा घर मालकाने जाऊन घराची स्थिती पाहिली तेव्हा त्याला धक्काच बसला. घराची अशी अवस्थी होती की त्या घरात पाय ठेवताना दहा वेळा विचार करतील. घरातील अवस्था पाहून घर मालकाने त्याचे फोटो काढले आणि ते रेडिटवर शेअर केले. 



घर भाड्याने दिल्यानंतर काय काळजी घ्याल?
घर भाड्याने दिल्यानंतर भाडेकरु सांगितलेल्या नियमांचं उल्लंघन करत नाही ना याची वरचेवर पाहणी करा. नियमांचं उल्लंघन केलं जात असले तर घरमालक करार मोडून भाडेकरुला घराबाहेर काढू शकतो. भाडेकरुने याला विरोध केल्यास घरमालक घरभाड्यांशी संबंधित विवादांवर निर्णय देणाऱ्या अधिकृत संस्थेकडे तक्रार करू शकता. शक्यतो घर भाड्याने देताना कुटुंबाला द्या. बॅचलर मुलं राहिया येणार असतील तर सर्व गोष्टींची नीट पडताळणी करा. तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करणे शक्य नसेल तर तुम्ही एका विश्वासू एजन्ट कडून पण करवून घेऊ शकता.