नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील कोरोना विषाणू संक्रमण थांबवण्याचं नाव घेत नाहीये. शुक्रवारी येथे 7802 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 6498 रुग्ण बरे झाले. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत 91 रूग्णांचा मृत्यू झाला. दोन दिवसांत दिल्लीत 195 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गाच्या वाढीसह, सक्रिय रूग्णांची संख्याही 44 हजारांपेक्षा जास्त झाली आहे, जी चिंताजनक आहे. त्याच वेळी, संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढून 13.80 टक्के झाले, तर गुरुवारी ते 11.71 टक्के होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे देशात गेल्या 24 तासात नवीन 44,684 रुग्ण वाढले आहेत. भारतातील एकूण कोरोना संक्रमणाची संख्या 87,73,479 वर गेली आहेत. 520 रुग्णांचा देशात मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 3,828 रुग्ण बरे झाल्यानंतर सध्या देशात सक्रिय प्रकरणे 4,80,719 इतकी आहेत.


आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, दिल्लीत आतापर्यंत चार लाख 74 हजार 830 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यापैकी चार लाख 23 हजार 078 रूग्ण बरे झाले आहेत. रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण 89.10 टक्के आहे. तसेच मृतांची संख्या वाढून 7423 झाली आहे. सध्या मृत्यूचे प्रमाण 1.56 टक्के आहे.


सध्या एकूण 44,329 सक्रिय रुग्ण आहेत. प्रथमच सक्रिय रूग्णांची संख्या या पातळीवर पोहोचली आहे. रुग्णालयात 8664 रुग्ण उपचार घेत आहेत. त्याच वेळी कोविड केअर सेंटरमध्ये 850 आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये 272 रुग्ण दाखल आहेत. तर 26,741 रूग्ण हे घरीच क्वारंटाईन आहेत.


दिल्लीत आतापर्यंत एकूण 53 लाख 78 हजार 827 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 56,553 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 19,910 नमुन्यांची आरटीपीसीआर आणि 36643 नमुन्यांची अँटीजेन चाचणी घेण्यात आली. अशा प्रकारे, आरटीपीसीआरच्या तपासणीत आणखी वाढ झाली आहे.


कोरोनाची प्रकरणे वाढत असताना कंटेनमेंट झोनमध्येही वाढ होत आहे. सध्या कंटेन्ट झोनची संख्या 4184. वर पोहोचली आहे.