... तर तुमचे PAN Card होईल निष्क्रीय; ना घर खरेदी करता येईल ना मोठे व्यवहार करता येतील
How to link Pan-Aadhaar: पॅन क्रमांक आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. परंतु, नवीन आर्थिक वर्षात तुम्हाला कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करायचे असेल, तर ते लिंक करणे अनिवार्य आहे.
मुंबई : How to link Pan-Aadhaar: पॅन क्रमांक आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. परंतु, नवीन आर्थिक वर्षात तुम्हाला कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करायचे असेल, तर ते लिंक करणे अनिवार्य आहे. जर अद्याप पॅन-आधार लिंक झाले नसेल, तर पॅन कार्ड अवैध मानले जाईल. निष्क्रिय पॅनद्वारे आर्थिक व्यवहार करणे शक्य होणार नाही.
पॅन रद्द झाल्यास काय होईल?
पॅनकार्ड रद्द झाल्यास अनेक अडचणी येऊ शकतात. तुम्ही बँकिंग व्यवहार करू शकणार नाही, मालमत्ता खरेदी-विक्री करू शकणार नाही, शेअर्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही..
दंडाची नवीन तरतूद
संसदेत सादर करण्यात आलेल्या वित्त विधेयकानुसार आयकर कायद्यात आणखी एक नवीन कलम जोडण्यात आले आहे. ते पॅन-आधार लिंकशी संबधित आहे. आयकर कायदा, 1961 मध्ये जोडलेल्या कलम 234H शी पॅन-आधार लिंक केले नसल्यास, 1000 रुपये पर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
10000 रुपये दंड
पॅन-आधार लिंक नसल्यास, पॅन कार्ड अवैध घोषित केले जाईल. कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही आर्थिक व्यवहारात अवैध पॅन कार्ड वापरल्यास त्याच्यावर 10000 रुपये दंड आकारला जाईल. हा दंड निश्चित करण्याचा अधिकार प्राप्तिकर अधिकाऱ्याला असेल. आयकर कायद्याच्या कलम 272B अंतर्गत 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो.
पॅन-आधार लिंक करणे का आवश्यक आहे?
कलम 139AA अंतर्गत, प्रत्येक नागरिकाला आयकर रिटर्न आणि पॅन कार्ड बनवण्यासाठी अर्जात आधार क्रमांक द्यावा लागेल. त्यामुळे पॅन आणि आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.
पॅन-आधार लिंक कसे करावे
पॅन-आधार लिंक करण्यासाठी, आयकर ई-फायलिंग वेबसाइटवर जा.
साइट पेजच्या डाव्या बाजूला तुम्हाला Quick Links चा पर्याय मिळेल. येथे तुम्हाला 'Link Aadhaar' पर्यायावर क्लिक करावे लागेल.
येथे तुम्हाला तुमचा पॅन, आधार क्रमांक आणि नाव टाकावे लागेल. ही माहिती दिल्यानंतर तुम्हाला एक OTP पाठवला जाईल.
ओटीपी टाकल्यानंतर तुमचा आधार आणि पॅन लिंक होईल.
लक्षात ठेवा की आयकर विभाग तुमची आधार आणि पॅन माहिती वैध आहे की नाही हे तुमचे तपशील तपासते.
तुमचा पॅन-आधार एसएमएसने लिंक करा
तुम्ही मोबाईलवरून पॅन कार्डसोबत आधार लिंक देखील करू शकता (पॅन-आधार लिंक). तुम्हाला एसएमएसद्वारे तुमच्या पॅनशी आधार लिंक करावे लागेल. 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवून आधार पॅनशी लिंक केला जाऊ शकतो, असे आयकर विभागाने म्हटले आहे.