ITR Filling Memes: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आज म्हणजे 31 जुलै 2022 आहे. आतापर्यंत 5 कोटींहून अधिक लोकांनी ITR भरला आहे. असं असलं तरी काही लोकांनी अजूनही ITR भरलेला नाही. त्यामुळे ITR दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आयकर वेबसाइट हँग होत असल्याचे बहुतेक लोकांचं म्हणणं आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरवर #ITRFiling ट्रेंड होत आहे. हा हॅशटॅश वापरून नेटकरी आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मीमर्स 'पंचायत' वेब सीरिजमधील बिनोद आणि 'तारक महेता'मधील जेठालाल, 'अ वेडनेसडे'मधील नसीरुद्दीन शाह आणि 'मै हूंना ना'मधील शाहरूखचे फनी मीम्स शेअर करत आहेत. हे मीम्स वेगाने व्हायरल होत आहेत.










31 जुलैनंतरही आयकर रिटर्न भरता येईल, पण करदात्यांना यासाठी दंडही होऊ शकतो. जर एखाद्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्याला 5000 रुपये दंड भरावा लागेल. त्याचवेळी, एखाद्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास, त्याला दंड म्हणून 1 हजार रुपये भरावे लागतील.