नवी दिल्ली: सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवावर दिल्लीतल्या ब्रार स्क्वेअर स्मशानभूमी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी रावत यांचं अखेरचं दर्शन घेतलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रावत यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. अखेरचा निरोप देताना सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सीडीएस बिपीन रावत यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 



बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांना एकाच चितेवर एकत्रच अग्नी देण्यात आला. रावत यांच्या मुली कृतिका आणि तारिणी यांनी अंत्यसंस्कार केले. दिल्लीतल्या ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत लष्करी इतमामात रावत यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.


अग्नी देण्याआधी लष्करानं 17 तोफांची सलामी दिली. त्यानंतर रावत आणि मधुलिका रावत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतमातेच्या या शूर योद्ध्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.


जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा तमिळनाडूमधील कुन्नूर इथे हेलिकॉप्टर अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीसह 11 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.