पैसा, पैसा जोडून पत्नीला शिकवले; नोकरीसाठी दुबईत गेल्यावर पतीला पाठवली घटस्फोटाची नोटीस
ज्योती मोर्य प्रकरण देशभर चांगलेच गाजत आहे. अशाच प्रकारे एका पत्नीने दुबईत नोकरीला गेल्यावर पतीला थेट घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे.
Jyoti Maurya Case: पीसीएस अधिकारी ज्योती मौर्या (Jyoti Maurya) प्रकरानंतर अशा प्रकारच्य अनेक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये देखील असाच प्रकार घडला आहे. पैसा, पैसा जोडू पतीने पत्नीला शिकवले. तिचे शिक्षण पूण झाल्यावर तिला नोकरीसाठी दुबईत पाठवले. मात्र, दुबईत गेल्यावर या पत्नीने पतीला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. तीन वर्षाच्या लेकराचा देखील या महिलेने विचार केला नाही.
लवकुश सिंह असे या पतीचे नाव आहे. अंगिरा सिंह असे पतीला घटस्फोटाची नोटीस पाठवणाऱ्या पत्नीचे नाव आहे. लवकुश हा कुशीनगर येथे राहणारा आहे. 2018 मध्ये मोठ्या थाटामाटात लवकुश सिंह आणि अंगिरा सिंह यांचा विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर अंगिराने लवकुश सिंह असे काही केले की त्याने कल्पनाही केली नव्हती.
मुल झाल्यानंतर पतीला नोकरी सोडायला सांगितली
लग्नानंतर पत्नीने शिक्षण घेण्याची इच्छ व्यक्त केली. लवकुश याने पैसा, पैसा जोडून अंगिराला बीएडचे शिक्षण दिले. यानंतर तिला नोएडाला नेले आणि चांगली नोकरी मिळवून दिली. पण अंगिरा सिंगला पतीचे प्रेम आणि समर्पण आवडले नाही. 2020 मध्ये मूल झाल्यानंतर अंगिराने मुलाची काळजी घेण्यासाठी पतीला नोकरी सोडायला सांगितली. मात्र, स्वत:ची नोकरी तिने सोडली नाही.
परदेशात नोकरीसाठी पतीने काढून दिला पासपोर्ट
नोएडा येथील मदरसन सुमी सिस्टम लिमिटेड कंपनीमध्ये काम करत असतानाच अंगिराला दुबईत नोकरीची ऑफर आली. पतीने तिची दुबईत नोकरी करण्याची इच्छा देखील पूर्ण केली. लवकुश याने स्वत: अंगिरा पासपोर्ट काढून दिला आणि तिला दुबईत पाठवले.
दुबईत गेल्यावर पती आणि मुलाला विसरली
अंगिरा दुबईत गेल्यावर काही दिवस पती आणि तीन वर्षाच्या मुलासह व्हिडिओ कॉलवर संपर्क साधत होते. अचानक तिने पतीला फोन करणे बंद केले. पतीचे फोनही ती उचलत नव्हती. लवकुश अंगिराला संपर्क करुन करुन थकला. मात्र, तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. शेवटी एक दिवस अंगिराने पाठवलेली घटस्फोटाची नोटीस लवकुश याच्या हातात पडली. घटस्फोटाची नोटीस पाहून लवकुश याला मोठा धक्का बसला. तीन वर्षाच्या मुलाचाही तिने विचार केला नाही.