सलमान खानला मारण्यासाठी खरेदी केली 12 लाखांची रायफल, लॉरेंसने केला खुलासा
सलमान खानला मारण्याचा होता कट. पण असा फसला.
मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सलमान खान याला अशा धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने सलमानच्या हत्येचा कटही रचला होता. पण त्याला यात अपयश आले होते.
सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या चौकशीदरम्यान तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमानच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली होती. लॉरेन्सने खुलासा केला होता की, त्याने राजस्थानचा गँगस्टर संपत नेहराला (Sampat Nehra) सलमान खानला मारण्यास सांगितले होते. यानंतर संपत नेहरा मुंबईला गेला. संपतने सलमान खानच्या घराची रेकीही केली होती.
लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने चौकशीदरम्यान संपतकडे पिस्तूल असल्याचे उघड केले होते. लांब अंतरामुळे संपतला सलमान खानपर्यंत पोहोचता आले नाही. संपतला त्याच्या गावातील दिनेश फौजीमार्फत स्प्रिंग रायफल मिळाली. बिष्णोईने ही रायफल त्याच्या ओळखीच्या अनिल पंड्याकडून 3-4 लाखांना विकत घेतली होती. पण जेव्हा रायफल दिनेशकडे होती. त्यानंतर ती पोलिसांनी पकडली. यानंतर संपत नेहरालाही अटक करण्यात आली होती.
सलमानला का मारायचे होते?
काळवीट शिकार प्रकरणामुळे (Antelope poaching case) लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. कारण गँगस्टर लॉरेन्स हा बिश्नोई समाजातील आहे. त्यामुळे काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला आरोपी बनवल्यावर लॉरेन्स चांगलाच संतापला होता. लॉरेन्स बिश्नोई गटाने सलमान खानला मारण्याची योजनाही आखली होती. रेडी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लॉरेन्सने सलमान खानवर हल्ल्याची योजना आखली होती. मात्र त्यात यश मिळू शकले नाही.
लॉरेन्स बिश्नोई हा दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. त्याच्या टोळीत 700 पेक्षा जास्त जण आहेत. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार एकत्र काम करतात. सिद्धू मुसेवाला याच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा हात असल्याचे वृत्त आहे.
सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीने धमकीचे पाठवले होते. वांद्रे येथील बँडस्टँड प्रोमेनेड येथे रविवारी हे पत्र सापडले. सलीम खान हे मॉर्निंग वॉकनंतर ज्या ठिकाणी बसायला जातात तिथे सलीम खान यांच्या गार्डला हे पत्र सापडले.
'सलीम खान, सलमान खान, लवकरच तुमची अवस्था सिद्धू मूसवालासारखी होईल', असे धमकीवजा पत्र लिहिले होते. याप्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. पोलिसांनी भादंवि कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता.