मध्य प्रदेश : भारतात अशी अनेक मंदिरं (Temple) आहेत, जी अतिशय रहस्यमयी (mysterious) आहेत. मुख्य म्हणजे आतापर्यंत याबाबत कोणताही खुलासा झालेला नाही. आजही आम्ही तुम्हाला अशाच एका मंदिराबद्दल सांगणार आहोत. या मंदिरामध्ये कोणीही थांबायला पाहत नाही. याचं कारण जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये असलेल्या महाकालेश्वर मंदिराबद्दल (Mahakaleshwar temple) आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मंदिरामध्ये दररोज हजारो भाविक दररोज येतात आणि महाकालचं दर्शन घेतात. या मंदिरात येणारे मंत्री, आमदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपतींसह देशातील सर्व मोठे नेते या मंदिरात येतात. मात्र हे नेते दर्शन घेऊन रात्री याठिकाणी राहत नाहीत. कारण त्यामागे मोठे कारण आहे.


मंदिरामध्ये न थांबण्याचं कारण


महाकालेश्वर मंदिरात गेल्यावर कोणताही मोठा नेता किंवा मंत्री याठिकाणी राहत नाही. असं म्हटलं जातं की, तो उज्जैनच्या बाहेर हॉटेलमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी राहतो. रात्रीच्या वेळी इथे विश्रांती घेणारा कोणताही नेता किंवा मंत्री सत्ता गमावतो, असं म्हटलं जातं. या भीतीमुळे कोणीही मंत्री, मुख्यमंत्री मंदिरात राहण्यास टाळतात.


असं म्हटलं जातं की, महाकाल बाबांचं दर्शन घेतल्यानंतर कोणत्याही नेत्याने इथे राहू नये. जर चूकून हा नेता थांबला तर त्याची सत्ता हिसकावून घेतली जाते. 


असंही म्हटलं जातं की, बाबा महाकाल हे स्वतः उज्जैन नगरीचे प्रमुख आहेत. त्यामुळे अशा स्थितीत त्यांच्या दरबारात दुसरं कोणीही मोठा राजा राहू शकत नाही. याठिकाणी चुकूनही कोणी थांबलं तरी त्याच्या सत्तेत परत कसे जायचं हे समजत नाही. राजा भोजाच्या काळापासून ही समजूत चालत आल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.