मुंबई: असं म्हणतात की आपलं ध्येय गाठण्यासाठी दृढ संकल्प आणि कठोर मेहनत या दोन्ही गोष्टी खूप आवश्यक असतात. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. केवळ 15000 रुपयांपासून सुरू केलेला व्यवसाय आज कोट्य़वधींपर्यंत पोहोचला आहे. फक्त जोखीम उचलण्याची तयारी आपल्यामध्ये हवी. जेवढी मोठी जोखीम तेवढा मोठा फायदा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15000 रुपयांच्या तुटपुंज्या रकमेतून व्यवसाय सुरू केला आणि आज याच व्यवसायात वार्षिक उलाढाल 1100 कोटींहून अधिक आहे.केविन केअरचे CEO सी के रंगनाथन यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास आज जाणून घेणार आहोत. रंगनाथन यांनी साचेबद्ध क्रांती घडवून संपूर्ण व्यावसायिक क्षेत्रात आपली एक वेगळीच दहशत निर्माण केली.


प्राणी-पक्षी पाळण्याचं वेड
आज व्यवसाय सुरू केला आणि उद्या प्रसिद्ध झाले असं नाही. तर रंगनाथन यांना कठोर मेहनत, कष्ट आणि जिद्द यामुळे व्यवसाय क्षेत्रात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. रंगनाथन यांचा तामिळनाडूतील कुड्डालोर इथल्या छोट्याशा शहरातून हा प्रवास सुरू झाला. त्यांचा जन्म अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात झाला होता. 


रंगनाथन यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या वडिलांकडून घेतलं. रंगनाथन तसे अभ्यासात खूप हुशार नव्हते. अभ्यात पुढे काही करण्यापेक्षा शेती किंवा व्यवसायात पुढे काही करावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. 


रंगनाथन यांना पाळीव प्राणी आणि पक्षी पाळण्याची खूप आवड होती. पाचवीमध्ये असते त्यांच्याकडे 500 कबुतरं होती. त्यांनी मासे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. हा आपला छंदातूम मिळालेल्या पैशातून छोटासा व्यवसाय सुरू करायचा त्यांनी ठरवलं.


शाम्पूच्या व्यवसायापासून सुरुवात
कॉलेजमध्ये असताना रंगनाथन यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी रंगनाथन यांच्या खांद्यावर आली. त्यानंतर त्यांनी आपले पाळीव प्राणी देऊन टाकले. आलेल्या पैशांमधून शाम्पू बनवण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला. 


सुरुवातीच्या काळात त्यांचा हा व्यवसाय नीट चालला नाही. त्यंनी आपल्या भावासोबत  वेलवेट इंटरनेशनल आणि त्यानंतर वेलवेट शाम्पूचा व्यवसाय सुरू केला. मात्र रंगनाथन यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यांना स्वत:ची कंपनी सुरू करून त्याचे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये उतरवयाचे होते. 


शाम्पूचे छोटे पाऊस करून 50 पैशांना गावोगावी विकायचं त्यांनी ठरवलं. चांगल्या क्वालिटी आणि प्रोडक्टबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांना बराच वेळ गेला. मात्र त्यामधून लोकांचा विश्वास जिंकला. त्यांनी पुढे चिक इंडिया नाव बदलून केविन केअर असं नाव ठेवलं. 


केविन केअर नावाने पुढे ब्यूटी प्रोडक्ट्स देखील बाजारपेठेत आले. वडिलांना आपले सर्वस्व मानणाऱ्या रंगनाथन यांनी आपली कंपनी वडिलांना समर्पित केली. केविन केअर नावाचा अर्थ प्राचीन सौंदर्य आणि तेज आहे. शाम्पू नंतर परफ्युमकडे वळण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्यांनी तयार केलेल्या उत्पादनातील गुलाब आणि चमेलीचा सुगंध लोकांना खूप आवडला.


गुलाब आणि चमेलीच्या फ्रेग्रेन्सचे 3.5 लाखहून अधिक पाऊच विकले गेले. आज वेगवेगळ्या प्रकारचे शाम्पू, हेअर कलर प्रोडक्ट्स आणि इतर उत्पादन बाजारात उपलब्ध आहेत. पिकल पाऊच, नाईल हर्बल शैम्पू, मीरा हेअर वॉश पावडर, फॉरएव्हर क्रीम,  इंडिका हेअर कलरिंग अशी अनेक उत्पादनं जी तुम्ही बाजारात पाहात असाल ती रंगनाथन यांच्या कंपनीची आहेत.