Tips For Farmers In Marathi: काळाप्रमाणे शेती करण्याची पद्धत ही बदलत गेली आहे. पारंपारिक शेतीबरोबरच आधुनिक शेतीचा वापरही शेतकरी मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत. नवीन योजनांसह व तंत्रज्ञान वापरुन शेतीच्या नव्या पद्धती समोर येत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगला नफादेखील मिळत आहे. शेतकरी शेतीत अनेक नवनवीन प्रयोग करत प्रगती करत आहे. नापीक जमिनीचा वापही शेतीसाठी केला जाऊ शकतो. त्याचा योग्य प्रकारे वापर केल्यास चांगला मोबदला मिळू शकतो. आम्ही आज तुम्हाला तीन अशा पद्धती सांगणार आहोत ज्यामुळं नापिक जमिनीवर तुम्ही चांगले पीक घेऊ शकता व त्यातून चांगला परतावादेखील मिळवू शकता. 


लेमनग्रासची शेती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लेमनग्रासची लागवड शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरु शकते. लेमनग्रासचा वापर परफ्युम, साबण, निरमा, डिटर्जेंट, तेल, हेअर ऑइल, मच्छर लोशन, डोकेदुखीचे औषध, कॉस्मेटिक बनवण्यासाठी वापर केला जातो. लेमनग्रासची लागवड शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. भारत दरवर्षी 700 टन लेमनग्रास ऑइलचे उत्पादन करते. या व्यतिरिक्त परदेशातही पाठवले जाते. अशातच अनेक परदेशातील कंपन्यांमध्येही तेलाची मागणी अधिक आहे. ज्यामुळं शेतकऱ्यांना नफा होऊ शकतो. लेमनग्रास रोपाची लागवड वर्षभरातून कधीही केली जाऊ शकते. एकदा बीज पेरल्यानंतर सहा वर्षांपर्यंत तुम्ही त्यातून पीक घेऊ शकता. 


शेतात लावा सोलर पॅनेल


देशात उन्हाळ्याच्या दिवसांत लोडशेडिंगच्या संकटापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांना सौरउर्जेचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. अनेक राज्य सरकार शेतकऱ्यांना सोलर पॅनल लावण्यासाठी सबसिडी देत आहेत. केंद्र सरकारदेखील पीएम कुसुम योजनेअतर्गंत शेतकऱ्यांना ही संधी देत आहेत. तुम्ही देखील तुमच्या नापिक जमिनीत सोलर पॅनेल स्थापित करु शकता. यातून उत्पादित होणारी वीज तुम्ही वीज वितरण कंपन्यांना देऊन चांगली कमाई करु शकता. 


शेतात लावा झाडे 


नापिक असलेल्या जमिनीतून चांगली कमाई करण्यासाठी तुम्ही शेतात झाडे लावू शकता. पण ही खूप मोठी प्रक्रिया असते यासाठी धैर्य ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या शेतात सागवान, महानीम, चंदन, खजूर यासारखे झाड लावू शकता. ज्यामुळं काही वर्षांनी त्याचे लाकडाचे उत्पादन होऊ शकते. यामुळं तुमच्या कमाईत भरघोस उत्पन्न होऊ शकते. या झाडांसाठी भुसभुशीत मातीची गरज नाहीये.