गांधीनगर सचिवालयात शिरला बिबट्या, शंभरहून अधिक अधिकारी तैनात
गांधीनगरमध्ये सचिवालयात बिबट्या शिरला.
अहमदाबाद : गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये सचिवालयात शिरलेला बिबट्या बाहेर पडल्याचा दावा वनविभागानं केला आहे. त्यामुळे सचिवालयातील सर्व पिंजरे हटवण्यात आलेत. तसंच बिबट्याचा सचिवालयाबाहेर शोध घेणं सुरू करण्यात आलंय.
सचिवालयात मध्यरात्री बिबट्या शिरला होता. गेट क्रमांक सातमधून हा बिबट्या आत येताना सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्यानंतर वनविभागानं परिसरात मोठे पिंजरेही लावले, शंभरहून अधिक अधिकारी तैनात करण्यात आले.
बिबट्याचा कसून शोध घेण्यात आला. मात्र आता बिबट्या याठिकाणी नसल्याचा दावा वनविभागानं केलाय. मात्र आता सचिवालयातून बाहेर पडलेला हा बिबट्या शहरात कुठे गेला याचा शोध घेण्यात येत आहे.