नवी दिल्ली : दिवसा ढवळ्या नागरिक रस्त्यावरुन जात होते त्याच दरम्यान अचानक एक आवाज आला आणि सर्वांनाच धक्का बसला. रसत्यावर बिबट्या पळत असल्याचं नागरिकांनी पाहिलं.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तराखंडमधील देहरादूनमध्ये भरदिवसा बिबट्या आल्याने सर्वांनाच धक्का बसला. या घटनेचा व्हिडिओ न्यूज एजन्सी एएनआयने प्रसिद्ध केला आहे. 


या व्हिडिओत एका घराच्या गेटवरुन घरावर चढताना बिबट्या दिसत आहे. बिबट्याला पाहून मिळेल त्या ठिकाणी नागरिकांनी लपण्याचा प्रयत्न केला. 


बिबट्या घरात शिरल्याचं पहिल्यानंतर नागरिक रस्त्यावर आल्याचं व्हिडिओत दिसत आहे.


रहीवाशी परिसरात बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले.



दरम्यान, ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.