नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाच्या फाईलवर स्वाक्षरी केली. त्याचप्रमाणे त्यांनी १२ आमदारांच्या फाईलवरही सही केली तर आम्ही राज्यपालांचा जाहीर सत्कार करू, असा टोला शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्राच्या अर्थसंकल्पावर टीका करताना ते म्हणाले, हे बजेट केवळ काही उद्योगपतींसाठीचे बजेट आहे. यामधून गुजरातच्या गिफ्ट सिटीला झुकतं माप दिल आहे. मात्र, मुंबईवर अन्याय केला आहे. मुंबईतले उद्योग पळविण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. इतर पक्षांना मुंबईवर कब्जा करायचा आहे. मुंबईला ओरबडायचं आहे. मात्र, आमच्यामुळे मुंबईची प्रतिष्ठा टिकून राहीलीय असे राऊत म्हणाले. 


पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप हाच प्रमुख विरोधी पक्ष आहे. शरद पवार, ममता बॅनर्जी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव हे एकमेकांशी संपर्कात आहेत. 


उत्तर प्रदेशमध्ये आमच्या ९ उमेदवारांचे नामांकन रद्द करण्यात आले. पण, गोव्यात त्याच कारणांसाठी उमेदवार स्वीकारले गेले. मुख्य निवडणूक आयोगाने आमची बाजू ऐकून घेतली नाही. त्यावर सुनावणीही घेतली नाही.  युपी निवडणूकीवर राजकीय दबाव असून हा खेळ लोकशाहीसाठी घातक असल्याचे ते म्हणाले. 


गोव्यात भाजपने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार दिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांची ज्या प्रवृत्तीला भाजपने पुढे केले आहे त्या प्रवृत्तीचा पराभव करण्यासाठी लढाई आहे. त्यांची लढाई भाजप विरोधात आहे.