नवी दिल्ली : चित्रकूटमध्ये वाणिज्य कर विभागात काम करणाऱ्या स्टेनोनं आपल्या 'उशिरा येण्याबद्दल' दिलेलं लेखी स्पष्टीकरण सध्या चर्चेचा विषय ठरतंय. दररोज कार्यालयात उशिरा येण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्टेनोकडे लेखी स्पष्टीकरण मागितलं होतं... यावर त्यांना जे उत्तर मिळालं त्यामुळे मात्र त्यांना डोक्याला हात मारून घेण्याची वेळ आली. स्टेनोनं दिलेलं लेकी उत्तर मात्र व्हायरल होतंय... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं काय उत्तर दिलं होतं स्टेनोनं...? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर वाचाच... 


'महोदय, 


सध्या माझ्या पत्नीची प्रकृती बिघडलेली असल्याकारणानं मलाच जेवण बनवावं लागतं. पत्नीचं शरीर दुखत असल्यानं मला तिचे हात-पाय चेपून द्यावे लागतात. चपात्या बनवता येत नसल्यानं त्या जळाल्या तर पत्नी रागावते... त्यामुळे सध्या मला दलिया बनवून खावं लागतंय. त्यातच रोडही खराब आहेत... जर मी घरातून पावणे दहा वाजता निघालो तरी कार्यालयात पोहचण्यासाठी वेळ होतो... त्यामुळे श्रीमानजी मी तुम्हाला निवेदन करतो की, उद्यापासून मी सकाळी लवकरच पत्नीची सेवा करेन आणि घरातून लवकर निघेन... बाकी साहेब तुम्ही समजुतदार आहात'


हे पत्र समोर आल्यानंतर, स्टेनोची ही वृत्ती चुकीची असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्याच्याविरुद्ध कारवाई करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.