नवी दिल्ली  : जम्मू-काश्मीर सतत कसे धगधग राहिल, असा प्रयत्न सातत्याने पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. त्यातच दहशतवादी संघटनाही प्रयत्नशील आहेत.  'लष्कर-ए-तोयबा' आणि 'हिजबूल मुजाहिद्दीन' या संघटना करत आहे. आज NIAने दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर छापे मारले. यावेळी त्यांना लेटरहेड सापडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावादी नेत्यांच्या धडा  शिकविण्यासाठी NIAने (राष्ट्रीय तपास संस्था)  छापा मारला. 'लष्कर-ए-तोयबा' आणि 'हिजबूल मुजाहिद्दीन' आदी दहशतवादी संघटनांचे लेटरहेड, पेन ड्राइव्ह आणि लॅपटॉप आदी साहित्य जप्त केले.


दिल्ली, हरियाणा आणि काश्मीरमधील वेगवेगळ्या २३ ठिकाणी तपास यंत्रणेने छापे टाकलेत. छापा टाकलेल्यांमध्ये फुटीरतावादी नेता सैयद अली शाह गिलानी याचा जावई अलताफ फंटूश, व्यापारी जहूर वाटाली, मीरवाईज उमर फारुख यांच्या नेतृत्वातील आवामी अॅक्शन कमिटीचे नेता शाहिद-उल-इस्लाम आणि काही इतर फुटीरतावादी नेत्यांचा समावेश आहे.


या छाप्यांत विविध ठिकाणांवर १ कोटी ५ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. याशिवाय काही दस्तावेजही जप्त करण्यात आले आहेत.