मुंबई : भारताच्या 24 राज्यांमध्ये आणि 23 केंद्रशासित प्रदेशातील 1000 चिकित्सकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीले आहे. इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलीवरी सिस्टमवर प्रतिबंध लावण्यासाठी पत्र लिहीण्यात आले आहे. ज्यामध्ये इएनडीएस  ई सिगारेट, ई-हुक्का यांचा सुद्धा समावेश होतो. आताची युवा पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सहजपणे फसतात. पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात एकूण 1,061 डॉक्टरांनी हस्तअक्षर केले आहे. तरूणांमध्ये आमली पदार्थांचे वाढते प्रमाण हे सार्वजनिकरित्या आरेग्यासाठी घातक असल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे. व्यापरी आणि उद्योग संस्था प्रसार आणि प्रचाराला प्रोत्साहन देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ई सिगारेटला ई-सिग, वेप्स, ई-हुक्का, वेप पेन या नावांनी देखील ओळखले जाते. जे इलेक्ट्रॉनिक निकोटीन वितरण प्रणाली (ईएनडीएस) आहे. काही ई-सिगरेट नेहमी दिसणाऱ्या सिगार किंवा पाईप सारखे दिसते. त्याचप्रमाणे काही फ्लॉश ड्राईव, पेन आणि रोजच्या वापरात असणाऱ्या वस्तूंप्रमाणे दिसत आहेत. अशा वस्तू तरूणांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत. 


मीडियाच्या माहितीनुसार, 30 संघटनांनी इंटरनेटवरील ईएनडीएसच्या प्रचारावर प्रतिबंध न लावण्यासाठी आयटी मंत्रालयाला पत्र लिहले होते. 28 ऑगस्ट, 2018 साली आरोग्य आणि कल्याण मंत्रालयने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ईएनडीएसवर प्रतिबंध लावण्यासाठी एक आदेश जारी केला आहे. 


यावर्षी मार्चमध्ये एमओएचएफडब्ल्यू ने नियुक्त केलेल्या आरोग्य तज्ञांच्या पॅनलने एक अहवाल सादर केला आहे. ज्यात ईएनडीएसवर 251 संशोधन अभ्यासांचे विश्लेषण केले गेले आहे. पॅनेलने निष्कर्ष काढला की, कोणत्याही इतर तंबाखू आरोग्यास हानिकारक आहे. ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्वे (2017) च्या अहवाला नुसार, भारतात 100 कोटी लोक धूम्रपान करतात.