नवी दिल्ली: 'कुहेतूने पछाडलेला पक्ष गेल्या निवडणुकीत विजयी झाला', अशी बोचरी टीका करीत, 'भारतातील लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे लोकशाही वाचविण्यासाठी धर्मनिरपेक्ष रजाकीय पक्षांनी एकत्र यावे', अशी भावना नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी व्यक्त केली आहे.


हुकूमशाही संपवण्यासाठी आपण धार्मिकतेचे बीज पेरायचे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका आयोजित कार्यक्रमात 'केंद्र सरकार, राजकीय-सामाजिक वातावरण' या विषयावर अमर्त्य सेन बोलत होते. या वेळी सेन यांनी भाजप सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये असलेली हुकूमशाही मोडीत काढण्याचा पर्याय म्हणजे भाजप असा एक प्रचार केला जातो. पण, हे केवळ अजब तर्कट आहे, असे सांगतानाच हुकूमशाही संपवण्यासाठी आपण धार्मिकतेचे बीज पेरायचे का? असा उद्विग्न सवाल सेन यांनी उपस्थित केला. तसेच, हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी धार्मिकतेचे तण पेरले गेल्यास भविष्यात धार्मिकतेचे हे तण उपटून काढण्यास प्रचंड कष्ट घ्यावे लागतील, असेही सेन यांनी म्हटले आहे.


 कुहेतूने पछाडलेल्या पक्ष सत्तेवर


दरम्यान, सध्या लोकशाही धोक्यात आहे. मात्र, ही परिस्थिती आपण बदलू शकतो. परिस्थितीत आपण सुधारणा करू शकतो. त्यासाठी प्रयत्न करताना आपल्यावर प्रहार होतील. पण, म्हणून बुडणारी बोट सोडून पळ काढणे हा पर्याय नाही. त्यासाठी ठाम उभे रहायला हवे, असे सेन यांनी ठासून सांगितले. दरम्यान, या पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत केवळ ३१ टक्के मते पडलेल्या पक्षाने ५५ टक्के जागा जिंकल्या. त्यामुळे कुहेतूने पछाडलेल्या पक्ष सत्तेवर आला, असा घणाघातही सेन यांनी केला.