मुंबई : तुम्हाला चांगली गुंतवणूक करायची असेल पण कुठे करावी हे समजत नसेल तर तुमच्यासाठी एलआयसीचा एक चांगला प्लान आहे. इथे गुंतवणूक करुन तुम्ही चांगले रिटर्न्स मिळवू शकता. एलआयसी SIIP इथे गुंतवणूक करणे फायद्याचे मानले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलआयसी निवेश प्लस प्लान (UIN 512L317V01) आणि एलआयसी SIIP (UIN 512L334V01)हे दोन प्लान एलआयसीतर्फे आणण्यात आले होते. एलआयसी निवेश प्लस सिंगल प्रिमियम, नॉन पार्टिसिपेटींग, यूनिट- लिंक्ड आणि व्यक्तिगत जीवन वीमा प्लान पॉलिसी अवधी दरम्यान वीमा सोबत गुंतवणूक करण्याचे पर्याय देखील देत असल्याचे एलआयसीचे मुख्य एमआर कुमार यांनी सांगितले.



काय आहे प्लान ?


योजना घेणारा सिंगल प्रीमियम रक्कम निवडू शकतो.


पॉलिसी घेणाऱ्याला किती रक्कम जमा करण्याची ती तो निवडू शकतो.


पॉलिसी घेताना त्याच्याकडे बेसिक सम अॅश्युअर्ड निवडण्याची सुविधा देखील आहे.


या दोन्ही योजना ऑफलाइन तसेच ऑनलाइन खरेदी करू शकता. 


२ मार्च २०२० ही योजना सर्वांसाठी उपलब्ध


एलआयसी SIIP 


एलआयसीची एसआयआयपी ही नियमित प्रीमियम, नॉन पार्टिसिपेटींग, युनिट लिंक्ड, वैयक्तिक जीवन विमा योजना आहे. यामध्ये पॉलिसीच्या मुदतीमध्ये विम्यासह गुंतवणूक देखील करता येऊ शकते. 


पॉलिसी घेणारे त्यांना भरायची प्रीमियम रक्कम निवडू शकतात. पॉलिसीची विशिष्ट मुदत पूर्ण झाल्यावर, वार्षिक प्रीमियमची टक्केवारी म्हणून हमी भरती सक्तीच्या पॉलिसीअंतर्गत युनिट फंडामध्ये जोडली जाते. वाटप केलेल्या निधी प्रकारानुसार युनिट खरेदी करण्यासाठी प्रीमियम आणि हमीभावाची जोड दिली जाणार आहे.


किमान प्रीमियम ४० हजार रुपये (वार्षिक) जास्तीत जास्त प्रीमियम मर्यादा नाही.


पॉलिसी पूर्ण झाल्यावर युनिट फंडाच्या मूल्याइतकी रक्कम दिली जाईल. पॉलिसीची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीच्या अटींनुसार त्यातून काही पैसे काढता येतात.


पॉलिसीचे फायदे 


जोखीम संरक्षण उपलब्ध
युनिट फंड मूल्यासह हमी नफा
पॉलिसी म्यॅचुरीटी युनिट फंड मूल्य