नवी दिल्ली : LIC IPO: पॉलिसीधारक देशातील सर्वात मोठ्या IPO LIC ची वाट पाहत आहेत. LIC पुढील आठवड्यात बाजार नियामक SEBI कडे IPO साठी कागदपत्रांचा मसुदा दाखल करू शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सेबीच्या मंजुरीनंतर कंपनीचा आयपीओ मार्चमध्ये येणे अपेक्षित आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलआयसी पॉलिसीधारकांना आयपीओमधून कमाई करण्याची जबरदस्त संधी आहे, जरी यासाठी तुमच्याकडे दोन गोष्टी असाव्यात - एक म्हणजे तुमच्या एलआयसी पॉलिसी खात्याशी लिंक केलेले पॅन आणि दुसरे म्हणजे डीमॅट खाते.


पॅन क्रमांक अपडेट करणे आवश्यक 


LIC चा प्रस्तावित IPO वॅल्यूच्या 10 टक्के पर्यंत पॉलिसीधारकांसाठी राखीव असेल. पॉलिसीधारकांनी त्यांचे पॅन तपशील एलआयसी रेकॉर्डमध्ये अपडेट केले आहे की नाही हे वेळीच तपासायला हवे.  IPO मध्ये सहभागी होण्यासाठी डीमॅट खातेदेखील असणे देखील आवश्यक आहे. 
IPO मध्ये बोली लावण्यासाठी KYC आवश्यक आहे. यामुळेच पॅन नंबर अपडेट करावा लागतो. पॉलिसीधारकांनी रेकॉर्डमध्ये दिलेली पॅन माहिती बरोबर आहे की नाही हे तपासावे. जर ते बरोबर नसेल तर पॅन माहिती अपडेट करणे आवश्यक आहे.


जर एखाद्या पॉलिसी धारकाकडे सध्या डीमॅट खाते नसेल, तर त्याने ते स्वतःच्या खर्चाने उघडण्याचे नियोजन करायला हवे. 


पॅन अपडेटची स्थिती तपासा


1) https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus वर जा.
2) पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन तपशील भरा, तसेच कॅप्चा प्रविष्ट करा. त्यानंतर सबमिट बटण दाबा.
3) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनवर स्टेटस तुमच्या समोर दिसेल.


याप्रमाणे अपडेट करू शकता


1) LIC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या https://licindia.in/
2) 'ऑनलाइन पॅन नोंदणी' या पर्यायावर क्लिक करा.
3) त्याच पेजवरील 'प्रोसीड' बटणावर टॅप करा.
4) तुमचा ईमेल पत्ता, पॅन, मोबाइल नंबर आणि एलआयसी पॉलिसी क्रमांक प्रविष्ट करा.
5) बॉक्समध्ये कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
6) तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून OTP साठी विनंती करा.
7) ओटीपी मिळाल्यावर तो पोर्टलमध्ये टाका आणि सबमिट करा.
8) फॉर्म सबमिट केल्यानंतर, नोंदणी विनंती यशस्वी झाल्याचा संदेश दिसेल.