LIC IPO Listing | देशातील सर्वात मोठ्या IPO ची आज शेअर बाजारात लिस्टिंग
LIC IPO Listing : देशातील आजपर्यंतचा सर्वात मोठा IPO मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. लिस्ट होण्यापूर्वी हा शेअर ग्रे मार्केटमध्ये घसरला. एलआयसीच्या शेअरबाबत तज्ञांचे मत जाणून घेऊया.
मुंबई : LIC IPO Listing : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा IPO (LIC IPO) मंगळवारी मेगा लिस्टिंग होणार आहे. 20,557 कोटी रुपयांच्या या IPO साठी सरकारला देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सोमवारी ग्रे मार्केटमध्ये या स्टॉकवर 20 रुपयांची सूट दिली जात होती. अशा स्थितीत या शेअर्सची लिस्टींग गुंतवणूकदारांची निराशा करू शकते, अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे.
शेअरची किंमत 949 रुपये निश्चित
LIC च्या शेअरची किंमत सरकारने 949 रुपये निश्चित केली आहे. पॉलिसीधारकांना 889 रुपये आणि कर्मचाऱ्यांना 904 रुपये दराने शेअर्स मिळतील. LIC चा IPO 9 मे रोजी बंद झाला. त्याचे शेअर्स 12 मे रोजी गुंतवणूकदारांना वाटप करण्यात आले. सरकारने IPO द्वारे LIC चे 22.13 कोटी पेक्षा जास्त शेअर्स (3.5 टक्के) ऑफर केले आहेत
देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO
एलआयसीचा आयपीओ गुंतवणूकदारांनी जवळपास तीन वेळा सबस्क्राइब केला होता. यामध्ये देशांतर्गत गुंतवणूकदारांनी सक्रिय सहभाग घेतला. मात्र, विदेशी गुंतवणूकदारांनी या आयपीओमध्ये फारसा रस दाखवला नाही. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO आहे. याआधी 2021 मध्ये पेटीएमचा आयपीओ 18,300 कोटी रुपयांचा होता. त्याआधी, 2010 मध्ये कोल इंडियाचा IPO सुमारे 15,500 कोटी रुपये होता.
एस्कॉर्ट्स सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इक्बाल म्हणतात की, एलआयसीचा स्टॉक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. स्टॉक 1000 रुपयांच्या खाली खरेदी केल्याने दीर्घकालीन फायदे मिळतील असे त्यांचे म्हणणे आहे.