मुंबई :  Business News : केंद्र सरकारकडून लवकरच गुडन्यूज मिळणार आहे. LIC IPOबाबत मोदी सरकारची मोठी अपडेट आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सर्वाधिक आस लागून राहिलेला एलआयसीचा आयपीओ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत येणार आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेरच्या तिमाहीत LIC चा आयपीओ येणे शक्य नाही, असे वृत्त काही संस्थांनी दिले होते. ते वृत्त केंद्राने फेटाळून लावले आहे. मात्र LIC चा IPO कधी येणार, याबाबतची निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. 


LIC चे मूल्यांकन  (LIC Valuation) करण्यात आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ जात आहे आणि म्हणूनच त्याच्याशी संबंधित औपचारिकता पूर्ण झालेली नाही. याव्यतिरिक्त, एलआयसीचे मूल्यांकन पूर्ण करण्यात अनेक समस्या येत आहेत. 



LIC जगातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक आहे. भारत सरकार LIC आणि बीपीसीएलद्वारे 1.75 लाख कोटी रुपयांचे टार्गेट पूर्ण करणार आहे.