मुंबई :  देशातील सर्वात मोठी विमा LIC च्या मेगा IPOचे नियोजन करण्यासाठी सरकारने गोल्डमॅन सॅक्स(इंडिया), सिटीग्रुप ग्लोबल मार्केट इंडिया आणि नोमुरा फायनान्शिअल एडवायझरी ऍंड सेक्योरिटीज इंडियासह 10 मर्चंट बँकर्सला नियुक्त केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्गुंतवणूक विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या सर्कुलर नुसार, या बँकर्सशिवाय एसबीआय कॅपिटल मार्केट, जेएम फायनान्शिअल, एक्सिस कॅपिलट, बोफा सेक्योरिटीज, जेपी मार्गन इंडिया, आयसीआयसीआय सेक्योरिटीज आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड सहभागी आहे.


अधिकारी तुहिन पांडे यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे की, सरकारने LIC च्या IPOसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स आणि काही अन्य सल्लागारांची अंतिम नियुक्ती केली आहे.


निर्गुतवणूक विभागाने 15 जुलै रोजी मर्चंट बॅंकर्सची नियुक्तीसाठी अर्ज मागवले होते. त्यानंतर 16 मर्चंट बँकर्सने LIC ची लिस्टिंग आणि निर्गुतवणूकीचे नियोजन करण्यासाठी सादरीकरण दिले आहे.


गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती प्रबंधन विभाग (DIPAM)ची भागीदारी विक्रीसाठी कायदेशीर सल्लागार नियुक्त करण्याच्या प्रक्रिया सुरू आहे. बोली लावण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर आहे. एक्चुरिअल फर्म मिलमॅन एडवायजर्स एलएलपी इंडिया (Milliman Advisors LLP India) ला आयपीओ एलआयसीच्या एम्बेडेड मुल्याचे आकलन करण्यासाठी याआधीच नियुक्त करण्यात आले आहे.  हे मुल्यांकन जानेवारी - मार्च 2022 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.