Apprentice Development Officer: एलआयसीमध्ये अनेकदा नोकरभरती निघते. याचा फायदा खूप लोकांना झाला आहे. एलआयसीमध्ये पुन्हा एकदा नोकरभरती (Recruitment) सुरू झाली आहे. यावेळी नोकरी शोधणाऱ्यांसाठी याचा चांगला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर ग्रॅज्यूएट (Graduate) झालेल्या विद्यार्थ्यांनाही याचा चांगला फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया की नक्की आता एलआयसीमध्ये कुठल्या पदासाठी नोकरभरती सुरू आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे. अप्रेंटिस डेव्हलमेंट सर्व्हिसेस या पदासाठी सध्या चांगली नोकरभरती आहे. या पदासाठी नक्की काय पात्रता लागते याची सर्व माहिती या लेखातून जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अप्रेंटिस डेव्हलमेंट सर्व्हिसेस या पदासाठी सध्या एलआयसीमध्ये नोकरभरती सुरू आहे. त्यासाठी एकूण 9 हजार पदं रिक्त आहेत. त्याचबरोबर या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल.


यासाठी ऑनलाईन फॉर्म आले आहेत. ज्यासाठी तुम्ही एलआयसीच्या वेबसाईटवर (LIC) जाऊन या पदासाठी अप्लाय करू शकता. या पदासाठी एकूण 9394 पदे रिकामी आहेत. या पदासाठी तुमची शैक्षणिक पात्रता असायला हवी. यासाठी तुमचे ग्रॅज्यूएशन होणे बंधनकारक आहे. तुमची कुठल्याही विषयात पदवी झाली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतो. तेव्हा तुम्ही जर का ग्रॅज्यूएट असाल किंवा या पदवीसाठी शिक्षण घेत असाल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. 


एलआयसीच्या संकेतस्थळावर (LIC Website) तुम्हाला या पदासाठीचे सर्व डिटेल्स मिळू शकतात. त्यासाठी तुम्ही या पदावरील नोटिफिकेशन्स पाहू शकता. या पदासाठी अर्ज करण्याअगोदर तुम्हाला एलआयसीचे सर्व नोटिफिकेशन्स वाचणे महत्त्वाचे आहे. आरक्षित विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना यासाठी सूटही मिळते. या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुमची वयोमात्रा ही 21 ते 30 वर्ष अशी असायला हवी. एसी आणि एसटी कॅटेगरीतल्यांसाठी 100 रूपये एप्लिकेशन फी आहे तर जनरल कॅटेगरीतली लोकांसाठी 750 रूपये शुल्क आकारले जाते. 


यासाठी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यू देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शॉर्टलिस्ट (Shortlist Candidates) झाल्यानंतर तुम्हाला प्री-रिक्रूटमेंट मेडिकल टेस्ट देणेही बंधनकारक आहे. एलआयसीमध्ये अनेकदा अशा नोकभरत्या निघत असतात. त्याच्या फायदा विद्यार्थ्यांना करून घेता येईल. या टेस्टसाठी लागणारे विषय तुम्ही एलआयसीच्या वेबसाईटवर आणि इंटरनेटवर शोधू शकता आणि त्याप्रमाणे तयारी करू शकता. तुम्ही तुमच्या मित्रांकडूनही यासंदर्भात माहिती घेऊ शकता.