LIC New Insurance Policy: जर तुम्हीही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. सध्या गुंतवणूकीचे पर्यायही वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अशा काही गुंतवणूकीच्या पर्यांयांपैंकी एक म्हणजे एलआयसीच्या गुंतवणूकीची योजना (LIC Scheme). आपल्या सर्वांच वाटतं की आपणं जिथे कुठे गुंतवणूक करू त्यातून आपल्याला चांगला नफा (profit) मिळेल आणि तोही फार सुरक्षित असेल. अशावेळी तुम्ही एलआयसीच्या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेतून तुम्हाला फार जोखीम नाही. त्यातून तुम्ही चांगल्याप्रकारे नफाही कमवू शकता. खरं म्हणजे छोट्या गुंतवणूकदारांसाठी हा खूप चांगला पर्याय आहे. तेव्हा जाणून घेऊया की LIC च्या या योजनेतून तुम्हाला नक्की कसा आणि किती फायदा होऊ शकतो. तुम्ही रोज 250 रुपये गुंतवून 54 लाख रुपयांचा फॅट फंड या योजनेतून बनवू शकता. 


LIC योजना नक्की काय आहे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

LIC ने एक उत्तम योजना गुंतवणूकदारांसाठी आणली आहे. ही योजना नॉन लिंक्ड (non - linked scheme) आणि खूप जास्त फायदेशीर आहे. या योजनेतून गुंतवणूकदाराला मोठी रक्कम मिळते एवढेच नाही तर जर एखाद्या अपघातामुळे योजनाधारकाचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक मदतही मिळते. गुंतवणूकदारांना त्यांच्या इच्छेनुसार प्रीमियमची रक्कम आणि कालावधी निवडण्याचा अधिकार आहे.


या पॉलिसीचे फायदे काय आहेत? 


  • यामध्ये तुम्हाला रिव्हर्शनरी बोनस आणि मॅच्युरिटीवर (maturity) अंतिम अतिरिक्त बोनसचा लाभ मिळतो. 

  • 8 ते 59 वयोगटातील नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतात.

  • 59 वर्षांची व्यक्ती 16 वर्षांसाठी विमा पॉलिसी निवडू शकते जेणेकरून परिपक्वतेच्या वेळी त्याचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त होणार नाही. 

  • यामध्ये पॉलिसीधारक 10, 13 आणि 16 वर्षांसाठी पैसे जमा करू शकतात जे 16 ते 25 वर्षांच्या मॅच्युरिटीवर पैसे दिले जातील.


पॉलिसी मेच्यूअर झाली की काय कराल? 


  • समजा एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या 25 व्या वर्षी जीवन लाभ पॉलिसी घेतली असेल तर आता तो दररोज 256 रुपये वाचवतअसेल त्यामुळे त्याची दरमहा गुंतवणूक 7700 रुपये होईल. 

  • म्हणजे त्याची वार्षिक गुंतवणूक = 92,400 रुपये. 

  • आता जर या गुंतवणूकदाराने 25 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तो सुमारे 20 लाख रुपये जमा करेल.

  • मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीधारकास मजबूत परताव्याच्या रूपात 54.50 लाख रुपयांची मोठी रक्कम मिळेल.