LIC Policy: एलआयसाची न्यू जीवन शांती योजना नक्की काय आहे? कसा घेता येईल तुम्हाला फायदा
LIC Policy: भारतीय जीवन विमा निगमकडून न्यू जीवन शांती योजना (New Jeevan Shanti Policy) तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा मिळवून देऊ शकते. ही योजना फक्त काही लोकांसाठीच मर्यादित आहे, खासकरून जे रिटायर (Retirement) झाले आहेत त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे.
LIC Policy: आजकाल सगळेच एलआयसी पोलिसीमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. अनेकांनी आपली एक पॉलिसी तरी काढायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आपल्यालाही नवनवीन पॉलिसीबद्दल (New Jeevan Shanti) जाणून घेण्याची इच्छा असते. त्यातून आता एलआयसी ही आपल्यापैंकी अनेकांना चांगल्या योजना देऊ करते आहे. त्यातीलच एक योजना म्हणजे न्यू जीवन शांती योजना (New Jeevan Shanti Yojana For Retirement). परंतु ही योजना नक्की आहे तरी काय? चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल. या योजनेमधून तुम्हाला चांगला फायदाही होऊ शकतो. भारतीय जीवन विमा निगमकडून न्यू जीवन शांती योजना तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा मिळवून देऊ शकते. ही योजना फक्त काही लोकांसाठीच मर्यादित आहे, खासकरून जे रिटायर झाले आहेत त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे.
ही योजना खास रिटायर्ड लोकांसाठी आहे जेणेकरून त्यांना रिटायर्डमेंटनंतर (Retirement Plans) कुठलाच त्रास होणार नाही आणि त्यांना आर्थिकदृष्ट्याही आपल्याला चांगला फायदा होईल. तुम्ही जर का या योजनेतून गुंतवणूक केलीत तर तुम्हालाही याचा चांगला फायदा होत तुम्हाला चांगले रिटर्न्स (Returns) मिळू शकतात त्यासाठी तुम्हाला फक्त या काही गोष्टी करणं आवश्यक आहेत. ही योजनेचा लाभ 30 ते 79 वयोमानापर्यंतचे नागरिक घेऊ शकतात. त्यातून जर का तुमचा पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याची सर्व रक्कम ही नॉमिनीला मिळते.
नक्की काय आहे न्यू जीवन शांती स्किम?
जर का तुम्ही रिटायर्ड होत असाल तर या योजनेचा तुम्हाला चांगलाच फायदा होऊ शकतो. तुमचे जे काही रिटायर्डमेंट प्लान्स असतील तर त्यांच्यासाठी ही स्किम खूप चांगली आहे. ज्यांना रिटायर्डमेंटनंतर पेन्शन घ्यायचे असेल त्यांच्यासाठीही ही योजना फायदेशीर आहे. त्याचसोबत गुंतवणूकीतून काही रक्कम जमा झाल्यानंतर ही योजना परिवक्व (Policy Mature) होईल आणि त्यानंतर तुम्हाला चांगली रक्कम मिळेल.
या योजनेतून तुम्ही गुंतवणूक कशी कराल?
न्यू जीवन शांति योजनामधून तुम्ही 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक (Investment) करू शकता. त्यातून तुम्ही 6 महिने, 3 महिने अथवा एका वर्षासाठीही घेऊ शकता. जर तुम्ही 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक कराल तर एका वर्षाला तुम्हाला 12000 रूपये मिळतील.
या योजनेचे बरेच फायदे आहेत. तुम्ही जर का लहान वयातच ही पॉलिसी घेतलीत तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यातून तुमचे रिटायर्डमेंट प्लान्सही (Retirement Policy) खूप सुखरूप राहतील आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याचा वेगळा फायदाही मिळेल.