LIC Policy Status: अनेक जण आपल्या आयुष्यात एक तरी विमा पॉलिसी घेतो. अशी एक सरकारी पॉलिसी आहे की त्यातून तुम्ही चांगली कमाई करु शकता. तसेच LICच्या अशा अनेक योजना आहेत, त्यातून तुमची कमाई करु शकता. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा पॉलिसीबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही दरमहा 36,000 रुपये कमवू शकता. एलआयसी गुंतवणूकदारांना दरमहा कमाई करण्याची संधीही देत ​​आहे. याशिवाय आपल्या जीवाची सुरक्षा आणि 50 हजार रुपयांची हमी देण्यात आली आहे. 


LIC या योजना पुन्हा सुरु करत आहेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

LIC नव्याने काही योजना सुरु करत आहेत. दरम्यान, LIC जीवन अक्षय पॉलिसी आहे आणि ही योजना कंपनी पुन्हा एकदा सुरु करत आहे. या पॉलिसी अंतर्गत, तुम्ही फक्त एक हप्ता भरुन संपूर्ण आयुष्य कमवू शकता. जीवन अक्षय पॉलिसी ही एक सिंगल प्रीमियम नॉन लिंक्ड नॉन-पार्टिसिपटिंग आणि वैयक्तिक वार्षिकी योजना आहे.


जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही


 जर तुम्हाला थोडे पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्याकडे वार्षिक 12,000 रुपये पेन्शनचा पर्याय आहे. दुसरीकडे, जर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त पैसे असतील तर तुम्ही इतर पर्याय निवडू शकता. फक्त 1 लाख रुपये गुंतवूनही तुम्ही दरमहा कमवू शकता. 1 लाख गुंतवल्यावर तुम्हाला दरवर्षी 12,000 रुपये मिळतील. सध्या या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. 


कोणाला या पॉलिसीचा मिळतो लाभ


- 35 वर्षे ते 85 वर्षे वयोगटातील लोक ही पॉलिसी घेऊ शकतात. 
- याशिवाय दिव्यांग व्यक्तीही या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात. 
- या पॉलिसीमध्ये तुम्ही 10 प्रकारे पेन्शन मिळवण्याच्या पर्यायाचा लाभ घेऊ शकता. 


36000 रुपये दरमहा कसे मिळवायचे?


या पॉलिसीमध्ये दरमहा 36,000 रुपये मिळविण्यासाठी, तुम्हाला एकसमान दराने आयुष्यासाठी देय वार्षिकी पर्याय निवडावा लागेल. यामध्ये तुम्हाला दरमहा एकरकमी पेन्शन मिळेल. उदाहरणार्थ - जर 45 वर्षांच्या कोणत्याही व्यक्तीने हा प्लान घेतला आणि 70,00,000 रुपयांच्या विमा रकमेचा पर्याय निवडला तर त्याला 71,26,000 रुपये एकरकमी प्रीमियम भरावा लागेल. ही गुंतवणूक केल्यानंतर त्यांना दरमहा 36429 रुपये पेन्शन मिळेल. मात्र, व्यक्तीच्या मृत्यूनंतर ही पेन्शन बंद होईल.