LIC Share Price Hike :  नव्या वर्षात आता आपल्या सर्वांचेच ध्येय आहे ते म्हणजे शेअर मार्केटवर (Share Market). कुठला शेअर आपल्याला किती फायद्याचा ठरू शकतो याकडे आपल्या सर्वांचेच लक्ष आहे. सध्या एलआयसीचा शेअर तुम्हाला चांगलाच फायद्याचा ठरू शकतो. हा शेअर 1000 रूपयांनी वाढण्याची शक्यता आहे. एलआयसी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 867.20 रूपये per share या दरानं लिस्टेड झाले आहेत. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) 8.11 टक्क्यांनी घसरले आहेत आणि 872 रूपये per share या दरानं लिस्टेड झाले आहेत. एलआयसीचा शेअरची किंमत 949 रूपये एवढी आहे. (lic share may surge to 1000 rupees per share see the details kotal securities listed share)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी या शेअरची किंमत 727.15 रूपयांवर पोहचली होती. ब्रोकरेज फर्म कोटक सिक्यूरिटीजनं हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला त्यामुळेच गुंतवणूकदारांना दिला आहे. या शेअरमधून येत्या काही दिवसात गुंतवणूकदारांना चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे येत्या नवीन वर्षात तुम्ही चांगलेच मालामाल होऊ शकता. या कंपनीची कॉर्पोरेट क्षेत्रातही चांगली प्रगती होताना दिसत आहे. सध्या शेअर मार्केटमध्ये बॅंकिंग इन्शुरन्स कंपनीला चांगला फायदा होऊ शकतो. कारण सध्या आयटी सेक्टरपेक्षा बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांना शेअर मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो आहे त्यामुळे सध्या एलआयसीही तुम्हाला चांगले रिटर्न्स देण्याची जोरात संधी निर्माण झाली आहे. 


शेअर बाजार तज्ञांच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांमध्ये या शेअरची किंमत वाढू शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांना या शेअरचा चांगलाच फायदा होऊ शकतो. त्यामुळे शेअर बाजार एक्पर्टनुसार या शेअरचा गुंतवणूकदारांनी फायदा घ्यावा आणि त्यांनी हा खरेदी करावा. एका महिन्यात हा शेअर 1000 रूपयांनी वाढू शकतो. 


हेही वाचा - Interesting Facts: वडा, भजी, भाजी, चिप्स... लज्जत वाढवणारा हा बटाटा आला तरी कुठून?


काय आहेत संकेत? 


देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीनं म्हणजेच एलआयसीनं याआधी गुंतवणूकदारांना चांगला फायदा करून दिला आहे. येत्या 2023 मध्येही ही कंपनी तिच्या शेअर मार्फत आपल्याला चांगला नफा देऊ शकते. या कंपनीचे ट्रेडिंग 5 टक्क्यांहून अधिक वाढले आहे. 


कोटक सिक्युरिटीचं मतं काय? 


कंपनीची VNB म्हणजे व्यावयायिक मुल्य हे सुधारत असून या शेअरची शेअर मार्केटवरील मार्जिनही चांगली प्रगती करते आहे. या कंपनीनं आपली धोरणंही स्पष्ट ठेवली आहेत त्यावरही कंपनी काम करत असून त्यातही चांगली प्रगती होताना दिसते आहे.  LIC ने FY22 मध्ये 37% APE मार्केट शेअरचं कव्हरेज ऑन केलं आहे.