LIC पॉलिसी होल्डर्ससाठी अत्यंत महत्वाची बातमी
सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी भारतीय जीवन बीमा निगम लिमिटेड (LIC) कंपनी पॉलिसी होल्डर्सवर भडकली आहे. आणि त्याचं कारण देखील तसच आहे.
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी भारतीय जीवन बीमा निगम लिमिटेड (LIC) कंपनी पॉलिसी होल्डर्सवर भडकली आहे. आणि त्याचं कारण देखील तसच आहे.
LIC ने आपल्या ग्राहकांना अलर्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या मार्फत भारतीय जीवन बीमा निगमच्या पॉलिसी धारकांकडे काही मॅसेजेस येत आहे. त्या मॅसेजमध्ये आधार कार्डाची माहिती देणारे संदेश फिरत आहे. हा मॅसेज जर पॉलिसी होल्डरला किंवा त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला आल्यास सावधान राहण्याचा इशारा LIC ने दिला आहे.
LIC कंपनीने कोणताही मॅसेज पाठवलेला नाही
कंपनीने आपल्या ग्राहकांना सतर्क केलं आहे की, कंपनीकडून कोणताही आधार कार्डची माहिती हवी असा मॅसेज पाठवला जात नाही. त्यामुळे पॉलिसी धारकांनी अशी कोणतीही माहिती शेअर करू नका अशी चेतावणी दिलेली आहे. त्यामुळे LIC ने आपल्या पॉलिसी होल्डर्सला अलर्ट केलं आहे. त्यामुळे कुणीही आधार नंबर शेअर केल्यास ती त्याची जबाबदारी राहिल.
सोशल मीडियावरील मॅसेज खोटा
LIC ने सार्वजनिक नोटीस पाठवून माहिती दिली आहे की, सोशल मीडियावर फिरणारा मॅसेज हा खोटा आहे. LIC च्या लोगोचा वापर करून हा मॅसेज व्हायरल केला जात आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची माहिती या मॅसेजला देऊ नये अशी विनंती LIC ने केली आहे. त्यामुळे कुणीही कोणतीही खाजगी माहिती त्या मॅसेजला शेअर करू नये