कोची : भारतीय नौदलाच्या सेवेत पहिल्या महिला वैमानिक सेवेत रुजू होण्यास सज्ज झाल्या आहेत. ४ डिसेंबर या नौदल दिनाच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २ डिसेंबरला लेफ्टनंट शिवांगी Lieutenant shivangi या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती सैन्यदलाच्या सूत्रांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लेफ्टनंट शिवांगी २ डिसेंबरला नौदलात रुजू होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. भारतीय नौदलात उत्तीर्ण होऊन निवड होणाऱ्या शिवांगी या पहिल्या महिला वैमानिक ठरतील. मुळच्या मुझफ्फरपूरच्या असणाऱ्या शिवांगी यांनी, डीएव्ही पब्लिक स्कूल येथून त्यांचने शालेय शिक्षण पूर्ण केल्याची माहिती सूत्रांनी पीटीआयला दिली. 


 भारतीय नौदलाकडून घेण्यात आलेल्या 27 NOC courseमध्ये तिने  Ezhimala  येथील नौदल अकादमीत प्रशिक्षण घेतलं. ज्यानंतर मागील वर्षी जून महिन्यात वाईस ऍडमिरल ए.के. चावला यांच्याकडून तिला कमिशन्ड करण्यात आलं. 


भारतीय नौदलातील एव्हिएशन विभागात एअर ट्राफिक कंट्रोल अर्थात हवाई वाहतूक नियंत्रण विभागात अधिकाऱ्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश असतो. 'ऑब्जर्व्हर' म्हणून रुजू असणाऱ्या या महिला अधिकारी या काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी जबाबदार असतात.



दरम्यान, साऊथर्न नेव्हल कमांड येथे प्रशिक्षणार्थी असणाऱ्या शिवांगी यांना २ डिसेंबरला ड्रोनिअर एअरक्राफ्ट उड्डाणाची अधिकृत परवानगी  मिळेल. यानिमित्ताने भारतीय नौदलात एक अशा पहिल्या महिला वैमानिक रुजू होणार आहेत, ज्यांना नौदलाकडूनच प्रशिक्षण मिळालेलं असेल.