केंद्रासोबतच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळात लिव ट्रॅव्हल कन्सेशन म्हणजेच एलटीसी वाया गेला. लॉकडाऊन आणि नंतर कोरोनाच्या भीतीमुळे लोकांचं बाहेर फिरणं झालं नाही, आणि त्यामुळे एलटीसीचा लाभ कर्मचाऱ्यांना घेता आला नाही. मात्र केंद्र सरकारने एलटीसीचे नवे नियम जाहीर केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना काळात जर कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना जीवन विमा काढला असेल, तर तो कर्मचारी एलटीसी स्कीममध्ये क्लेम करता येऊ शकतो. एलटीसी स्कीममध्ये केलेल्या या नव्या बदलाचा लाभ केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही होणार आहे. त्यामुळे देशभरातील अशा करोडो नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.


कोरोना काळातील परिस्थिती लक्षात घेता, गेल्या वर्षी केंद्र सरकारने एलटीसी कॅश वाऊचर स्कीमही लाँच केली होती. या स्कीम अंतर्गत १२ ऑक्टोबर ते ३१ मार्च या कालावधीत १२ टक्के किंवा त्याहून जीएसटी असेलेल्या गोष्टींची खरेदी केल्यास त्यांना आयकरमधून सूट मिळवण्यासाठी दावा करता येऊ शकतो. याशिवाय एलटीसी कॅश वाऊचर स्कीम अंतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्याला कमीत कमी १० हजार मिळणार आहेत.


एलटीसी नेमकं असतं काय?


एलटीसी म्हणजेच Leave Travel Concession ही सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी सुविधा आहे. या स्कीम अंतर्गत ४ वर्षात कर्मचाऱ्यांना दोनदा फिरण्याचे पैसे सरकारतर्फे दिले जातात. कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे वर्गवारी केलेली असते. मात्र गेल्या वर्षी एलटीसी न मिळाल्याने सरकारी कर्मचाऱी निराश झालेले. त्यामुळेच कर्मचाऱ्यांसाठी एलटीसी कॅश वाऊचर स्कीम आणि आता तर एलटीसी स्कीममध्येच कोरोना काळात काढलेला जीवन विमा क्लेम करता येणार आहे.