मुंबई: एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पवासानं सारं काही उद्ध्वस्त केलं असा काळजात धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ काळजात धडकी भरवणारा आहे. 
पावसादरम्यान अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट सुरू आहे. गुरुग्राममध्येही असेच हृदयद्रावक दृश्यं समोर आलं आहे. पाऊस आल्यानं आडोशाला उभ्या असलेल्या चार लोकांवर अचानक वीज कोसळली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 



ही घटना गुरुग्राम येथील सेक्टर -82 मध्ये वाटिका सोसायटीजवळ घडली आहे. या घटनेत एकाचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या तीन जणांना मानेसरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार तीन माळी आणि एक सुपरवायझर यांच्यावर ही वीज कोसळून दुर्घटना घडली. गुरुग्राममध्ये पाऊस कोसळत आहे. त्याच वेळी झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.