नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे.


IRCTCची जबरदस्त योजना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करता तर मग आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक जबरदस्त स्किम घेऊन आली आहे.


१०,००० रुपये कॅशबॅक


या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या IRCTC अकाऊंटसोबत आधार कार्ड लिंक करणं फारच गरजेचं आहे. तसं केलं असल्यास तुम्हाला १०,००० रुपये कॅशबॅक किंवा मोफत रेल्वे तिकीट जिंकण्याची संधी मिळू शकते.


लकी ड्रॉवर आधारित स्किम


इतकचं नाही तर IRCTC अकाऊंटवरुन आधार लिंक केल्यास तुम्ही प्रत्येक महिन्याला सहा ऐवजी १२ तिकीटं बुक करु शकता. ही स्किम एका लकी ड्रॉवर आधारित आहे. 


असं करा IRCTC अकाऊंटसोबत आधार लिंक 


  • सर्वप्रथम तुम्हाला IRCTC अकाऊंटवर लॉगिन करावं लागेल.


  • IRCTCचं पेज लॉगिन होताच तुम्ही My Profileवर जा, त्या ठिकाणी शेवटचा पर्याय आधार KYC असेल त्यावर क्लिक करा.


  • यानंतर ओपन होणाऱ्या कॉलममध्ये तुमचा आधार नंबर इन्सर्ट करा. त्यानंतर सबमिट होताच तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड येईल.


  • व्हेरिफिकेशन कोर्ड इन्सर्ट करतचा तुमचं आधार कार्ड आणि तुमचं IRCTC अकाऊंट लिंक होईल.


तिकीट बुकींगसाठी दिलेले पैसेही परत मिळणार


रेल्वेच्या या लकी ड्रॉ स्किमचा लाभ प्रत्येक महिन्यात ५ नागरिकांना होणार आहे. लकी ड्रॉ जिंकणाऱ्यांना केवळ १०,००० रुपयांचं बक्षीस मिळणार नाही तर, त्यांनी तिकीट बुकींगसाठी दिलेले पैसेही त्यांना परत मिळणार आहेत. मात्र, यासाठी तुमच्या IRCTC प्रोफाईलमध्ये जे तुमचं नाव आहे तेच नाव रेल्वे तिकीटावर असणं बंधनकारक आहे.


IRCTCच्या वेबसाईटवर विजेत्यांची माहिती


लकी ड्रॉ स्किम जिंकणाऱ्यांची माहिती IRCTCच्या वेबसाईटवर पहायला मिळेल. त्यासोबतच विजेत्यांच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवरही मेल करण्यात येणार आहे.


ही स्किम डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु करण्यात आली असून आगामी सहा महिने सुरु राहणार आहे.