मुंबई : सिंहाला जंगलाचा राज म्हणतात. सिंहाचा दबदबा संपूर्ण जंगलात असतो. सिंहाने एकदा शिकार करायची ठरवली की ती शिकार झालीच म्हणून समजा. त्याच्यासमोर भल्याभल्या जनावरांची खैर नसते. मात्र याच जंगलाच्या राजाची म्हशीनं पळता भुई थोडी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंह म्हशीची शिकार करण्यासाठी आला. मात्र त्याला ही शिकार करणं चांगलंच महागात पडलं आहे. याचं कारण म्हणजे सिंहावर म्हशींच्या कळपात स्वत: चीच शिकार होण्याची दुर्दशा आली होती.


एकीच बळ काय असतं ते या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. एका म्हशीचा जीव धोक्यात आहे ते पाहून म्हशींचा कळप तिला वाचवण्यासाठी येतो. या म्हशींपासून वाचवण्यासाठी अखेर सिंहावर धूम ठोकण्याची वेळ येते. मात्र धूम ठोकणार कशी हा प्रश्न पडतो. 


या व्हिडीओमध्ये पाहू शकता की सिंह आपला जीव वाचवण्यासाठी कसाबसा झाडावर चढून बसला आहे. म्हशी कधी निघून जातील याची वाट पाहात आहे. तोल सुटला तर तो खाली पडणार आणि म्हशी त्याला सोडणार नाहीत हे पक्क आहे. त्यामुळे जीवाच्या भीतीनं तो झाडावर चढून बसल्याचं पाहायला मिळत आहे. 


हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. सिंहाची अवस्था पाहून युजर्सनी खूप कमेंट्स केल्या आहेत. एकीच बळ काय असतं ते या व्हिडीओमधून दिसत आहे.