नवी दिल्ली : एखाद्या सिनेमात पाहिलं असेल की जंगल सफारी करताना अचानक काहीतरी मोठी दुर्घटना किंवा प्राणी जिपमध्ये आल्याचे प्रकार घडतात. अनेकदा पर्यटकांच्या चुकीच्या वागण्यामुळे वन्यप्राणी त्यांचा पाठलाग करतात. त्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर 2 मिनिटं धक्का बसेल. सिंह किंवा वाघ जरी समोर आला तरी आपली बोबडी वळल्याशिवाय राहणार नाही. इथे तर चक्कएक सिंह पर्यटकांच्या गाडीत घुसल्याचं दिसत आहे. गाडीला सिंहाने घेरलं आहे. गाडीला सिंहाने घेरलं आहे. 


सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 31 सेकंदाचा आहे. सिंहाना पाहून या पर्यटकांनी काय अवस्था झाली असेल याची कल्पना करू शकता. व्हिडीओच्या सुरुवातीला वाहन चालक हसताना दिसत आहे. पण पुढच्याच क्षणी ड्रायव्हरच्या मागे एक सिंहीण झाडावर बसलेली दिसेल. 


मजेची गोष्ट म्हणजे सिंहीण ड्रायव्हरवर हल्लाही करत नाही तर ती शांतपणे बसून पर्यटक काय करतात ते पाहात आहे. व्हिडीओमध्ये पुढे एक सिंह गाडीमध्येच घुसल्याचं दिसत आहे. काही लोक गाडीत बसलेल्या महिला पर्यटकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.


हा सगळा गोंधळ सुरू असताना तिथल्याच लोकांनी याचा व्हिडीओ केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. nature27_12 नावाच्या युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. साडेआठ हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by (@nature27_12)


हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झी 24 तास ह्या व्हिडीओची कोणतीही पुष्टी करत नाही.