खंडवा: सध्या अनेक ठिकाणी लसीकरणासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्स नागरिकांना दिल्या जात आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अधिकाऱ्याने अजब दावा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशच्या एका उत्पादन शुल्क अधिकाऱ्याने दारूसंदर्भात अजब दावा केला आहे. 'दारूमध्ये सर्वाधिक प्रामाणिकपणा आहे'. असा दावा उत्पादन शुल्क अधिकाऱ्याने केला आहे. 


खंडवा जिल्ह्यातील कोणत्याही दुकानात कोविड-19 विरोधी लसीचे दोन्ही डोस लागू केल्याशिवाय दारूची विक्री केली जाणार नाही. अशा सूचना स्थानिक दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. 


दारू खरेदी करण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला कोविड लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल का? हा प्रश्न विचारल्यावर अधिकाऱ्यांचं विचित्र उत्तर ऐकायला मिळालं. अधिकाऱ्यांच्या मते, प्रमाणपत्र दाखवावं लागणार नाही. केवळ त्याला तोंडी माहिती द्यावी लागणार आहे.


दारूच्या दुकानातील सेल्समन दारू विकत घेणाऱ्याला लसीकरणाबद्दल माहिती विचारेल. त्यावर ग्राहकाने हो म्हटले तर त्याला दारू विकली जाईल. ज्याने दोन्ही डोस घेतले आहेत त्यालाच मद्य दिलं जाईल.


किरार यांच्या म्हणण्यानुसार दारुमध्ये सर्वात जास्त प्रामाणिकपणा असतो.' यानंतर दारू विकत घेतलेल्या व्यक्तीकडे दोन्ही लसी असल्याचे सिद्ध कसे करायचे, असे विचारले असता ते म्हणाले, 'हे त्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणावर आहे.'


असं झालं तर खोटं बोलून लोक दारू विकत घेतील असा एकाने प्रश्न विचारला. त्यावर अधिकारी म्हणाले, ते खोटं बोलू शकतात पण आम्हाला आशा आहे की दारू पिणारे लोक कधी खोटं बोलत नाहीत.