Lithium deposits found in J&K: भारतात ईव्ही अर्थात इलेक्ट्रिक व्हेईकलचा बोलबाला वाढतोय. पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडल्यानं इलेक्ट्रिक कारचा वापर वाढला आहे. अशावेळी तमाम भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण ई कारमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या लिथियमचा (Lithium reserves) सर्वात मोठा खजिना देशात पहिल्यांदाच सापडलाय. जम्मू काश्मीरच्या सलाल हैमाना या निवासी भागात लिथियमचा प्रचंड मोठा साठा असल्याची खुशखबर जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानं दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिथियमचं महत्त्व काय?


  • लिथियम हा एक धातू आहे

  • कार, रिक्षा अशा इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी बनवण्यासाठी लिथियमचा वापर होतो

  • मोबाईल फोन, लॅपटॉप बॅटरी, सोलर पॅनेल, डिजिटल कॅमेरा, घड्याळं, क्रीडा उत्पादनं यामध्येही लिथियमचा वापर होतो.

  • चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधून प्रामुख्यानं लिथियमचा पुरवठा होतो.

  • आता भारतात लिथियमचं घबाड सापडल्यानं या देशांचं वर्चस्व मोडीत निघणाराय.



पुढचं युग हे ईव्ही अर्थात इलेक्ट्रिक कारचं असणार आहे. प्रदूषणाला आळा घालणाऱ्या ईव्ही कारचा वापर वाढावा, यासाठी सरकारकडून विविध सवलती दिल्या जातायत. आता देशामध्येच लिथियम बॅटरी तयार करणं शक्य होणार असल्यानं इलेक्ट्रिक कारचा बाजार चांगलाच वधारणार आहे. त्यामुळे भारताचीही झूप, झॅप, झूम अशी सुपरफास्ट प्रगती होणार आहे.