Little boy gifts Isro Chief : चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच इस्रोच्या (ISRO) वैज्ञानिकांची जगभरात चर्चा होत आहे. त्यांच्या या अभुतपूर्व कामगिरीचं जगभरातून कौतूक होताना दिसतंय. चांद्रयान-3 नंतर आता इस्त्रोने आदित्य एल-1 चं यशस्वी प्रक्षेपण केलंय. त्यामुळे आता चर्चा तर होणारच... लहान मुलांपासून ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चांद्रयान-3 च्या लँडिंगची उत्सुकता होती. अनेक शाळामध्ये विद्यार्थ्यांना चांद्रयान-3 ची माहिती देण्यात आली होती. तसेच लाईव्ह लँडिंग दाखवण्यात आली होती. त्यामुळे लहान मुलांमध्ये कमालीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच आता एका लहान चिमुकल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची सोशल मीडियावर चर्चा असते. विमानातून प्रवास करताना इस्त्रोचे प्रमुखांसाठी प्रवाशांनी टाळ्यांच्या कडकडाट केला होता. इंडिगो एअरलाइन्सच्या एका एअर होस्टेसने फ्लाइटमधील प्रवाशांना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या उपस्थितीची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांचं कौतुक होताना दिसत होतं. अशातच आता एका चिमुकल्याने इस्त्रो प्रमुखांना एक खास गिफ्ट दिलं आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.


एका लहान मुलाने चांद्रयान-3 मोहिमेदरम्यान चंद्रावर नेलेल्या विक्रम लँडरचे एक मॉडेल तयार केलं. या मुलाने इस्त्रो प्रमुखांना हे मॉडेल गिफ्ट म्हणून दिलं. त्यानंतर एस सोमनाथ यांनी चिमुकल्याचं कौतुक करत शाब्बासकी दिली. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसत आहे.



दरम्यान, चांद्रयानानंतर आता भारताची ही पहिली सूर्य मोहीम (isro first sun mission) आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन आदित्य एल-1 मिशन लॉन्च झालं. PSLV-C57 रॉकेटद्वारे आदित्य एल-1 (Aditya L1 Launch LIVE)  सॅटलाइट पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये सोडण्यात आलं.