Aadhar Card Photo Little girl Trending Video : असंख्य लोक आधार कार्डसाठी फोटो काढायला गेल्यावर कितीही प्रयत्न केला तरी तो काही चांगला निघत नाही. त्यामुळे आधार कार्डवरील फोटो हा अनेक वेळा चर्चेचा आणि विनोदाचा विषय ठरतो. माझ्या आधार कार्डवरील फोटो छान आहे असं म्हणणारी एकही व्यक्ती तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही कितीही देखणे असो पण आधार कार्डवरील फोटो हा काही आपल्याला साजेशा निघत नाहीत. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये आधार कार्डसाठी फोटो काढताना आपला फोटो छान निघावा यासाठी चिमुकलीने जे काही पोझ दिले आहेत. ते पाहून नक्कीच तुम्ही त्या चिमुकलीच्या प्रेमात तर पडाल शिवाय तो इतरांना शेअर करण्यासोबत मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवाल. (Little girl cute Aadhar card photo video viral trending now)


Cuteness Overloaded! 'या' चिमुकलीनं अशा पोझ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चिमुकलीचा व्हिडीओ तिच्या आईन सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो व्हायरल झालाय. एवढंच नाही तर सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ? हा व्हिडीओ एका आधार सेंटरचा आहे. जिथे एक छोटीशी चिमुकली आईसोबत आधार कार्डसाठी फोटो काढायला आली आहे. तिची कम्प्यूटरवरील कॅमेरापर्यंत उंची पोहोचत नाही म्हणून तिला खुर्चीवर उभ करण्यात आलंय. ती चिमुकली कॅमेऱ्याकडे बघून एकशे एक पोझ देताना दिसत आहे. कधी गालावर बोट ठेवून तर कधी डोळे मिचकत हसतानाचा तिचा हा व्हिडीओ हृदयात घर करतो. या चिमुकलीचे गोंडस हास्य पाहून नेटकरी घायाळ होत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by BabyNaysha (@gungun_and_mom)


हा व्हिडीओ 28 जूनला @gungun_and_mom नावाच्या अकाऊंटद्वारे इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलाय. ज्याला आतापर्यंत 9 लाख 51 हजार लाईक्स मिळालेय. तर 17.9 दशलक्षपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओवर शेकडो लोक प्रेमळ कमेंट करताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिलंय, 'मुलीच्या स्टाईलने मन जिंकलंय'. दुसऱ्याने मुलीला 'पार्ले जी' मुलगी म्हटलंय. तिसरा यूजर म्हणतो, 'ती जन्मताच मॉडेल बनली.' तर चौथा म्हणातो 'आतापर्यंतचा सर्वात सुंदर व्हिडीओ'.