Crime News : ऑनलाईनच्या जमान्यामध्ये आर्थिक फसवणुकीची अनेक प्रकरण आपण पाहिली आहेत. अशातच आता पोलिसांनी  एका महिला टोळीला ताब्यात घेतलं आहे. महिला युवकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ बनवत होते. त्यानंतर तेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय आहे प्रकरण?
आरोपी महिलांची टोळी एका वेबसाईटच्या मदतीने युवकांना फ्रेंडशीपच्या नावाखाली ई-मेल करायच्या. या ई-मेलला जर युवकाने रिप्लाय केला की त्या महिला त्याच्यासोबत चॅटिंग करायच्या. चॅट करताना महिला युवकांना बोलण्यामध्ये अडकवायच्या. तरूणांसोबत अश्लील चॅट, त्यानंतर लाईव्ह व्हिडिओ यादरम्यान स्क्रीनशॉट घ्यायच्या.


या स्क्रीनशॉटचा व्हिडीओ आणि फोटोंचा वापर करून तरूणांना ब्लॅकमेल करायच्या. शेवटी बदनामी आणि भातीमुळे तरूण मुलं या महिला टोळीची शिकार होत होतीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी वेबकॅम त्यांच्या मोबाईलला जोडून संपूर्ण सेटअप तयार केला होता. ज्याद्वारे वेबसाइटवर येणाऱ्या व्यक्तीला जाळ्यात अडकवून त्याचा व्हिडीओ शुट केला जात होता.


या महिलांच्या मोबाईलमधून पोलिसांना अनेक पुरुषांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. ज्यांच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग केलं जात होतं. या प्रकरणाबाबत पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की, या ब्लॅकमेलिंग टोळीतील इतर सदस्यांचा शोध सुरू आहे. त्याचबरोबर अटक करण्यात आलेल्या तीन महिलांची कसून चौकशी करण्यात येत आहे.


दरम्यान, याप्रकरणी नंद ग्राम, कवी नगर आणि विजय नगर येथील महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर या टोळीशी संबंधित आणखी एक महिला आणि आकाश नावाचा एक व्यक्ती अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद इथली आहे.