भावाच्या पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप पडलं महागात, 12 मुलांच्या आईने दिराचा प्रायव्हेट पार्टच खेचला अन्...
Crime news : गेल्या तीन वर्षापासून आपल्या भावाच्या पत्नीसोबत तो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. एक दिवशी भांडण्यात 12 मुलांच्या आईने दिराचा प्रायव्हेट पार्टच खेचला अन्...
Live-in-Relationship Murder Crime : राजस्थानमधील बारमेरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या लहान भावाच्या पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (live-in relationship ) राहणाऱ्या व्यक्तीची हत्या झाली आहे. धक्कादायक म्हणजे भावाच्या पत्नीने दिराच्या प्रायव्हेट पार्ट (Private Part) अत्यंत जोरात खेचल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यू व्यक्तीचं नाव 50 वर्षीय मालाराम जोगी असं आहे. (live in relationship with brother wife mother of 12 children lover cut the private part of the partner Crime news)
नेमकं काय झालं?
आरोपी महिला आणि मालाराम हे गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इन मध्ये राहत होते. या नात्यातून या दोघांची चार मुलंही असून आरोपी महिलेला एकूण 12 मुलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. घटनेच्या रात्री मालाराम आणि प्रेयसी म्हणजे भावाची बायको यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं. या भांडण्यात मालारामने प्रेयसीवर कानाशिलात लगावली. या रागात वहिनीने दिराच्या प्रायव्हेट पार्ट अत्यंत जोरात दाबून खेचला. या घटनेनंतर मालाराम जागीच कोसळला आणि बेशुद्ध झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रायव्हेट पार्टला अंतर्गत गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टराने घोषित केलं.
दीर आणि भावजयचा वादाचं कारण अस्पष्ट
या प्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी करत आहे. याप्रकरणी लिव्ह-इन रिलेशनशिपमधील महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमधील दीर आणि भावजय यांच्यातील वाद कशामुळे टोकाला गेला होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.
आरोपी महिलेला 12 मुलं
मालारामच्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर तो लहान भावाच्या पत्नीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. लिव्ह इनमध्ये राहत असताना त्यांना चार मुलं झाली होती. गेल्या काही वर्षांपासून ही दोघं पती-पत्नीसारखीच राहत होती. पण अचानक दोघांमध्ये झालेल्या वादामुळे मालाराम याला त्याचा जीव गमवावा लागला आहे. आरोपी महिला 12 मुलांची आई असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.