नवी दिल्ली :  जम्मू काश्मीरच्या पुलवामातील अवंतीपोरा भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राजधानी नवी दिल्लीतील घडामोडींनाही वेग आलाय. पंतप्रधानांच्या निवासस्थानी - ७ लोककल्याण मार्ग इथं कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची महत्त्वाची बैठक सुरू झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या बैठकीत गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री अरुण जेटली, परदेश मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, एनएसए अजीत डोवाल, गुप्तचर विभागाचे (आयबी) उच्च अधिकारी यांशिवाय तिन्ही सेनेचे अध्यक्षही उपस्थित आहेत. या बैठकीत सीआरपीएफचे डी जी पुलवामातील आत्मघातकी दहशतावादी हल्ल्याची माहिती कमिटीला दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीत दहशतवाद्यांविरुद्ध उत्तरादाखल कारवाई केली जाईलच. परंतु, पुलवामा दहशतवादी हल्यावर मोदी सरकारकडून एक डोजियरही तयार करण्यात येईल ज्यामध्ये या हल्ल्यामागे पाकिस्तानाचाच हात असल्याचे पुरावे असतील. याद्वारे पाकिस्तानचा चेहरा जगासमोर आणला जाईल आणि पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करण्याचं धोरण अवलंबिलं जाऊ शकतं.  


या बैठकीनंतर राजनाथ सिंह जम्मू-काश्मीरकडे रवाना होणार आहेत. ते जखमींची भेट घेण्यासाठी रुग्णालयातही जाणार आहेत. आज पंतप्रधान मोदींनीही आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केलेत. तसंच भाजपनंही आपले सर्व कार्यक्रम रद्द केलेत. 



 


अधिक वाचा :- पुलवामा दहशतवादी हल्ला : 'तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहचेपर्यंत मी जन्नतमध्ये पोहचलो असेन'


जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. या आत्मघातकी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. देश आणि जगभरातून या हल्ल्याची निंदा होत आहे. संयुक्त राष्ट्र संघानेही या हल्ल्याची निंदा केली आहे. आम्ही जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याची निंदा करतो. शहीद झालेले जवान आणि त्यांच्या परिवाराप्रती आमच्या संवेदना आहेत. जखमींच्या दीर्घायुष्याची आम्ही प्रार्थना करतो असे यूएनने म्हटले आहे. आता भारत सरकारच्या मोठ्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शहीद जवानांनी देशासाठी सांडलेले रक्त वाया जाणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जम्मू काश्मीरच्या स्थितीवर विचार विनिमय करण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची (सीसीएस)ची आज बैठक सुरू आहे. 


अधिक वाचा :- जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करणारा कोण होता आदिल डार


सीसीएस सुरक्षा प्रकरणी महत्त्वाचे निर्णय घेते. जैश ए मोहम्मदच्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये हल्लेखोरांनी काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या बसला स्फोटकांनी भरलेल्या स्वत:च्या गाडीने ठोकर दिली. सीआरपीएफच्या जवानांचा ताफा श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने जात होता. यात दोन हजारांहून अधिक जवानांचा समावेश होता. 



या मार्गावरील एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी स्फोटकांचा साठा ठेवला होता. सीआरपीएफच्या वाहनांचा ताफा जवळ आल्यानंतर दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. आयईडी स्फोटानंतर गोळीबाराचेही आवाज येत होते. जखमींना तत्काळ श्रीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात येत होते. गेल्या काही वर्षातील हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला ठरला आहे.