मुंबई : बाहेरचं किंवा स्ट्रीट फुड खाणं कोणाला आवडत नाही? आपल्यापैकी असे अनेक लोक असतील, ज्यांना घरच्या जेवणापेक्षा बाहेरचं खाण्याची चटक जास्त असते. परंतु तुम्हाला माहितीय का, की बाहेरचं खाणं आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकतं. हो कारण घरचं जेवणं हे आपण साफ आणि स्वच्छ ठिकाणी बनवतो, तसेच आपण यामध्ये चांगल्या प्रतीचे पदार्थ किंवा भाज्या वापरतो. जे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु त्याच्याच विरुद्ध बाहेरचे पदार्थ हे आपल्या आरोग्यासाठी धोकदायक असतात, कारण ते कोणत्या साफ ठिकाणी बनवलं जात नाही, शिवाय लोकांची ते बनवण्याची पद्धत कशी असते हे आपल्याला माहित नसतं. याचंचं एक जीवंत उदाहरण देणारी एक बातमी समोर आली आहे.


चंदीगडमधील एलांते मॉलच्या सागर रत्न आउटलेटमध्ये दिल्या जाणाऱ्या छोले-भटुरेच्या प्लेटमध्ये एक सरडा आढळून आला. या घटनेनंतर अन्न आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने सागर रत्न आउटलेटला भेट दिली आणि अन्नाचे नमुने गोळा केले. हे नमुने अन्न चाचणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल येत्या १५ दिवसांत येईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.


हा घटनेनंतर तेथील लोकांना देखील मोठा धक्का बसला आहे.


आरोग्य विभागाने प्रसारमाध्यमांना सांगितले की, "माहिती मिळाल्यानंतर, अन्न आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने सागर रत्न आउटलेटला भेट दिली आणि ज्या अन्नामध्ये सरडा आढळला त्या अन्नाचे नमुने घेतले. हे नमुने अन्न तपासणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल येत्या १५ दिवसांत येईल. त्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल."


ट्विटरवर व्हिडीओ शेअर करून तक्रार



एका ट्विटर वापरकर्त्याने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याने असा दावा केला आहे की, भटुरामध्ये त्याला एक सरडा सापडला आहे. युजरने ट्विटमध्ये लिहिले की, ''14 जुन 2022  रोजी सागर रतन, फूड कोर्ट, एलांते मॉल, चंदीगड येथे त्याला खूप भयानक अनुभव आला. येथे भटुरेमध्ये मृत सरडा आढळून आला.''


दरम्यान, एलांटेच्या प्रवक्त्याने अधिकृत निवेदन जारी केले आणि सांगितले की स्वच्छता आणि संरक्षकांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे आणि अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल. ज्यानंतर या आरोग्य विभागाने याप्रकरणाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.