नवी दिल्ली : उद्योगपती मित्रांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला कर्जाच्या संकटात लोटल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मोदींच्या कार्यकाळात ४ वर्षात ५७ टक्क्यांनी कर्ज वाढले, असा दावा काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला. मार्च २०१९ पर्यंत देशावरील कर्ज ९० लाख ५० हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मोदी यांनी देशाला कर्जाच्या संकटात लोटल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 


'...तर मुलांना चौकीदार, चहावाले व्हावे लागेल'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्विट करत नाव न घेता मोदींवर निशाणा साधला आहे. विचार करून मतदान करा नाहीतर उद्या तुमच्या मुलांना चौकीदार, चहावाले किंवा भजीवाला व्हावे लागेल, असे सिद्धू यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. देशातल्या ९ राज्यात चौथ्या टप्प्यातले मतदान पार पडले आहे. मतदारजागृतीसाठी राजकीय नेत्यांनी ट्विटच्या माध्यमांतून आवाहन केले होते. यावर नवज्योत सिंग सिद्धू यांनीही ट्विट करत मोदी यांचे नाव न घेता निशाणा साधला.