Lockdown 2 : पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
पंतप्रधान मोदी यांनी ७ गोष्टींमध्ये देशाची साथ मागितली
नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. त्यांनी प्रथम डॉ.बाबासाहेब आबेंडकर जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. तसेच कोरोनाच्या संकटाशी लढणाऱ्या जनतेला नमन केले.
महत्वाचे मुद्दे :
३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार
कोरोनावर मात करणारी लस तयार करण्यासाठी नव वैज्ञानिकांनी पुढे या !
पंतप्रधान मोदींनी देशाला दिली सप्तपदी
सफाई कर्मचारी, पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांच सन्मान करा
आपल्या सोबत काम करणाऱ्या व्यक्तींची काळजी घ्या...कोणाला कामावरुन काढू नका
शक्य होईल तितक्या गरिब परिवारांची काळजी घ्या..त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य सेतू एप डाऊनलोड करा
रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गरम पाणी, काढा प्या
घरी बनवलेल्या मास्कचा वापर करा.
लॉकडाऊनचे पूर्णपणे पालन करा.
घरातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या. विशेषत: जे आजारी आहेत त्यांची विशेष काळजी घ्या.
प्रत्येक क्षेत्राच मुल्यांकन करणार
परिस्थिती पाहून देशभरात निर्णय घेणार
सरकारकडून उद्या नवी नियमावली सादर करणार
२० एप्रिलनंतर हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी लोकडाऊन चे नियम शिथिल करणार
देशवासियांचे योद्ध्याप्रमाणे कार्य
सण, उत्सवांच्या काळात नियमांचे पालनं करा