नवी दिल्ली : देशभरातील कंटेन्मेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा केल्यानंतर शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था उघडल्या जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 8 जूनपासून शॉपिंग मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. 8 जूनपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स धार्मिक स्थळं खुली करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊन 5 साठी सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. ग्रीन, रेड, ऑरेंज झोन रद्द करुन केवळ कंटेन्मेंट झोन असणार आहे. चित्रपटगृह, स्विमिंग पूल, जिम, आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद राहणार आहे. दुकानांमध्ये केवळ 5 लोक एकावेळी खरेदी करु शकतात. अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 लोक उपस्थित राहू शकतात. 


नवे नियम 1 जून ते 30 जूनपर्यंत लागू असणार आहेत.


कंटेन्मेंट झोनबाहेर टप्प्याटप्प्याने सुट देण्यात आली आहे. गाईडलाईन्सनुसार, लॉकडाऊन तीन फेजमध्ये उघडण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यानुसार, 8 जूनपासून धार्मिक स्थळं, हॉटेल, सलून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.


देशभरात रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू लागू असणार आहे. लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतात. यासाठी पासची आवश्यकता नसणार आहे.